शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या सभेत सरकारी धोरणांवर टीका

By admin | Updated: May 4, 2017 01:35 IST

काँग्रेसच्या बुथ कमिटी निवडणुकीच्या नियोजनाबाबत २ मे रोजी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची सभा

पदाधिकाऱ्यांची उपस्थिती : अनुदानापासून शेतकरी वंचित राहात असल्याचा आरोप गडचिरोली : काँग्रेसच्या बुथ कमिटी निवडणुकीच्या नियोजनाबाबत २ मे रोजी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची सभा माजी आमदार तथा काँग्रेसेच जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात आयोजित करण्यात आली. या सभेत सरकारच्या धोरणावर टीका करण्यात आली. या सभेला जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. रामभाऊ मेश्रराम, मनोहर पोरेटी, रवींद्रनाथ शहा, पंचायत समिती सभापती दुर्लभा बांबोळे, नगरसेवक सतीश विधाते, पं. स. सदस्य मालता मडावी, ओबीसी सेलचे अध्यक्ष पांडुरंग घोटेकर उपस्थित होते. सिंचन विहिरी तसेच कुंपनासाठी अनुदान मिळविण्याकरिता शेतकऱ्यांना सुरुवातीला १० टक्के रक्कम जमा करण्यास सांगितले जात आहे. त्यानंतरच अनुदानाची रक्कम दिली जात आहे. शेतकरी अनुदानाची रक्कम भरू शकत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. डॉ. नामदेव उसेंडी आमदार असताना चिचडोह, हळदीपुराणी उपसासिंचन योजना मंजूर करण्यात आली. सध्याचे सरकार मात्र केवळ देखावा करीत आहे, असा आरोप करण्यात आला. यावेळी राजेश ठाकूर, सुरेश भांडेकर, पी. टी. मसराम, अ‍ॅड. बाबासाहेब आखाडे, हेमंत भांडेकर, हरबाजी मोरे, लालाजी उंदीरवाडे, कुलदीप इंदुरकर, मिलींद किरंगे, भुपेंद्र भैसारे, निशांत नैताम, प्रवीण दासरवार उपस्थित होते.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड करायची असल्याने बुथ कमिट्या स्थापन केल्या जाणार आहेत. बुथ कमिटीच्या मतदानासाठी पक्षाचे सभासद होणे गरजेचे आहे. प्रत्येक बुथवरून एक बुथ अध्यक्ष निवडला जाईल. बुथ अध्यक्षांमधून एक ब्लॉक अध्यक्ष निवडला जाईल. सहा जिल्हा प्रतिनिधी व प्रदेश प्रतिनिधी हे जिल्हा कमिटीचे मतदार राहतील. या निवडणुकीच्या नियोजनाबाबतही चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व बुथ कमिट्या १० मे च्या आत स्थापन करणे गरजेचे राहणार आहे.