शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
7
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
8
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
9
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
10
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
11
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
12
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
13
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
14
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
15
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
16
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
17
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
18
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
19
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
20
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!

जिल्हाधिकारी, जि.प. सीईओंनी केला गुप्त दौरा

By admin | Updated: September 6, 2014 23:47 IST

तालुका ठिकाणच्या शासकीय कार्यालयातील कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी रणजितकुमार, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांनी संयुक्तरित्या शनिवारी दुपारच्या

एटापल्ली : तालुका ठिकाणच्या शासकीय कार्यालयातील कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी रणजितकुमार, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांनी संयुक्तरित्या शनिवारी दुपारच्या सुमारास एटापल्ली तालुक्याचा गुप्त दौरा केला. दरम्यान पंचायत समिती कार्यालयातील अनेक कर्मचारी गैरहजर दिसून आल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. यापूर्वीही जिल्हाधिकारी रणजितकुमार व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांनी धानोरा, कोरची व अन्य तालुक्यात गुप्त दौरा करून प्रशासकीय कामाची पाहणी केली. दरम्यान अनेक शाळांमध्ये शिक्षक गैरहजर असल्याचे दिसून आले होते. दुर्गम भागात कार्यरत अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहून योग्य सेवा देत नाही. याचा परिणाम शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत प्रकर्षाने जाणवला. त्यामुळे जिल्हाधिकारी व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गेल्या काही दिवसांपासून गुप्त दौऱ्याचा सपाटा लावला आहे. शनिवारी दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एटापल्लीच्या पंचायत समिती कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रत्येक विभागात जाऊन पाहणी केली. दस्ताऐवजाची तपासणीही त्यांनी केल्याची माहिती आहे. यावेळी पं.स. कार्यालयात संवर्ग विकास अधिकारी लुटे यांच्यासह अनेक कर्मचारी गैरहजर होते. याबाबत जिल्हाधिकारी रणजितकुमार व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाला भेट देऊन तेथील कामांची माहिती जाणून घेतली.