शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणाचा अस्थमा रुग्णांना धाेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:35 IST

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये विविध आजारांचे प्रमाण वाढत असते. विविध रोगांना कारणीभूत ठरणारे जीवजंतू वाढतात. त्यामुळे संसर्गाचे प्रमाणसुद्धा वाढते. विशेष करून ...

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये विविध आजारांचे प्रमाण वाढत असते. विविध रोगांना कारणीभूत ठरणारे जीवजंतू वाढतात. त्यामुळे संसर्गाचे प्रमाणसुद्धा वाढते. विशेष करून या दिवसांमध्ये सूर्यप्रकाश कमी असतो. त्यामुळे वातावरणात सारखा बदल झालेला दिसतो. या काळात सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढतात. काहींना दम्याचा त्रास असल्यास त्यांना तो त्रास वाढत असताे. लहान मुलांमध्येदेखील आजाराचे प्रमाण वाढते. त्यामुळे ज्यांना दम्याचा त्रास आहे, त्यांनी वेळीच काळजी घेणे गरजेचे असते. खास करून राेग प्रतिकारक शक्ती वाढविण्यावर भर दिला पाहिजे. दमा आजार असलेल्या रुग्णांनी नियमित औषधोपचार घेतल्यास या आजारापासून काही प्रमाणात सुटका मिळू शकते.

बॉक्स

अशी घ्या काळजी

दमा असलेल्या रुग्णांनी थंड वातावरणात जाऊ नये, आंबट पदार्थ टाळावेत. डॉक्टरांनी दिलेले औषध नियमित घ्यावे, तसेच सोबत बाळगावे. ज्यांना पंप किंवा नेब्युलायजर देण्यात आले आहे, त्यांनी ते जवळ बाळगावे. संसर्ग होणार नाही, यासाठी विशेष काळजी घ्यावी. रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी हमखास प्रयत्न करावे.

बॉक्स

बालकांनाही हाेताे अस्थमा

बालकांना सर्दी-खोकला होतो. मग दम लागतो. अशा स्थितीत थंड वातावरण, पावसात भिजणे, थंड पदार्थ टाळणे तसेच उग्र वासापासून मुलांना दूर ठेवावे. त्रास जाणवत असला तर बालक अस्वस्थ असतात. अशावेळी त्याच्याकडे विशेष लक्ष देऊन वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या दिवसांमध्ये बालकांकडे अधिक लक्ष देऊन त्यांना अस्थमा होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.

बॉक्स

प्रतिकारशक्ती कमी

रोग प्रतिकारक शक्ती कमी असलेल्या नागरिकांना अस्थमा तसेच इतर आजारांची बाधा लवकर होते. आपण वारंवार आजारी पडत असाल तर आपली रोग प्रतिकारक शक्ती कमी आहे, हे जाणून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वारंवार सर्दी किंवा थंडी वाटत असेल तर कमी प्रतिकारक शक्तीचे लक्षण असू शकतात. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी पौष्टिक पदार्थ खाण्याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.

कोट

वातावरणातील बदलामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अस्थमा रुग्णांची संख्या वाढत असते. ज्यांना या आजाराचा त्रास आहे, त्यांनी वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करावा. थंड व आंबट पदार्थ खाणे कटाक्षाने टाळले पाहिजे. दम्याच्या रुग्णांनी आपली औषधी नेहमी सोबत ठेवावी. - डाॅ. प्रशांत कारेकर, हृदयराेग तज्ज्ञ, गडचिराेली.