शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

अहेरी जिल्ह्याच्या मागणीसाठी बंद

By admin | Updated: August 3, 2014 00:06 IST

अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्यावतीने अहेरी जिल्हा घोषित करण्यात यावा, या मागणीसाठी १ आॅगस्ट रोजी बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी अहेरी शहर व तालुक्यात

अहेरी : अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्यावतीने अहेरी जिल्हा घोषित करण्यात यावा, या मागणीसाठी १ आॅगस्ट रोजी बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी अहेरी शहर व तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच मुलचेरा, भामरागड तालुक्यात बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. मुलचेरा, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा या तालुका मुख्यालयाचे अंतर गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून मोठे आहे. यामुळे या जिल्ह्याच्या विकासाकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या चारही तालुक्यात उद्योग, सिंचन, विद्युत, शिक्षण, आरोग्य व बेरोजगारीची समस्या आहे. यामुळे या तालुक्यातील नागरिक विकासापासून तसेच शासकीय योजनांपासून वंचित आहेत. विकासासाठी अहेरी हा स्वतंत्र जिल्हा निर्माण होणे काळाची गरज आहे, असा निर्धार करून या परिसरातील नागरिकांनी बंदमध्ये सहभाग घेतला. शासनाने यापूर्वी वाशिम, नंदूरबार, गोंदिया आदी जिल्ह्याची निर्मिती केली. तसेच नुकताच पालघर जिल्हा घोषित केला. त्यामुळे आता १५ आॅगस्टपर्यंत अहेरी जिल्ह्याची घोषणा करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अहेरी येथे मुख्य रस्त्यावर टायर जाळून रास्तारोको करण्यात आला. आॅटो चालकांनी आॅटो रिक्षा वाहतूक बंद ठेवून बंदला पाठिंबा दर्शविला. तालुक्यातील देवलमरी येथेही आॅटो रिक्षा व शाळा कॉलेज बंद ठेवण्यात आले होते. अहेरी येथील बंद आंदोलनात कृती समितीचे अध्यक्ष रघुनाथ तलांडे, अतुल उईके, विलास रापर्तीवार, पवन कोसरे, अजय चौधरी, मनोज मडावी, श्रीनिवास मेश्राम, मुकेश कोसरे, सुरज कोसरे यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. मुलचेरा येथील बंदमध्ये बादल शहा, सुभाष दलपती, मनोज कर्मकार, रवी दुर्गे, शंकर हलदार, ओपू मुजूमदार, दीपक परचाके, गणेश बंकावार, दिनेश पेंदाम, नरेश मलिक, वीजू डोर्लीकर, कृष्णा हलदार, बुद्धी विश्वास, मांतेश पाल, बासू घरोधर, राबीन शहा, निखिल ईज्जतदार, सुभाष पाल तसेच भामरागड येथे झालेल्या आंदोलनात आशिफ सुफी, प्रदीप कर्माकार, ज्योतींदा डे, अक्रमखान पठाण, बहादूर आलाम, चित्तरंजन बाला, रहेमान शेख, संतोष बडगे, रमेश मारगोनीवार आदींसह शेकडो नागरिक उपस्थित झाले होते.शुक्रवारी जिल्हाभरात नागपंचमीचा सण साजरा करण्यात आला. मात्र सणाच्या दिवशीही स्वतंत्र अहेरी जिल्ह्याच्या मागणीसाठी बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला अहेरी, मुलचेरा, भामरागड आदी तालुक्यात १०० टक्के प्रतिसाद मिळाला. (प्रतिनिधी)