शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कर्मचारी हक्कांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 01:44 IST

गडचिरोली नगर परिषदेत एकूण २७ सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र या सफाई कर्मचाऱ्यांना नगर परिषद त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवत आहे, असा आरोप अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस कामगार संघटना जिल्हा गडचिरोलीचे अध्यक्ष छगन महातो यांनी केला आहे.

ठळक मुद्देछगन महातो यांचा आरोप : गडचिरोली न.प. तील कामगारांना आवश्यक सुविधा नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेत एकूण २७ सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र या सफाई कर्मचाऱ्यांना नगर परिषद त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवत आहे, असा आरोप अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस कामगार संघटना जिल्हा गडचिरोलीचे अध्यक्ष छगन महातो यांनी केला आहे.महाराष्ट्र शासनाच्या १ डिसेंबर १९९० च्या शासन निर्णयानुसार स्थायी महिला सफाई कर्मचाºयांना तीन साड्या, तीन पेटीकोट, तीन ब्लाऊज, चप्पल, पुरूष कर्मचाऱ्यांना टेरिकॉटचे तीन पॅन्ट, तीन शर्ट, हातमोजे, लांब बुट व सफाई कामाचे साहित्य देण्याचे प्रावधान आहे. मात्र गडचिरोली नगर परिषद यापूर्वी हे सर्व साहित्य देत नव्हते. १२ जून २०१७ रोजी सफाई कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे कामबंद आंदोलन केल्यानंतर नगर परिषदेने चार लाख रूपयांचा निधी मंजूर केला. मात्र महिला सफाई कर्मचाऱ्यांना केवळ ३०० रूपये किंमतीची साडी दिली आहे. सदर साडी ९०० रूपयांची असल्याचे सांगितले जात आहे. काही साड्या फाटल्या आहेत. वास्तविक शासकीय गणवेशामध्ये मोडेल, अशी साडी देणे आवश्यक असतानाही घरगुती वापराची साडी दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत कामगारांना मोफत सदनिका देण्याचा निर्णय असूनही नगर परिषदेने कारवाई केली नाही. याबाबत नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी व अभियंता यांना विचारणा केल्यास आपल्याकडे वेळ नसल्याचे सांगून टाळाटाळ करीत आहेत. यावरून नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी सफाई कामगारांचे प्रश्न सोडविण्यास फारसे गंभीर नसल्याचा आरोप केला आहे.कंत्राटी तत्त्वावर जवळपास १०० सफाई कामगार कार्यरत आहेत. या कामगारांना मागील तीन महिन्यांपासून मजुरी देण्यात आली नाही, अशी माहिती महाते यांनी दिली. पत्रकार परिषदेला संघटनेचे उपाध्यक्ष योगेश सोनवाने, सहसचिव प्रितम राणे, तालुका संघटिका नितेश सोनवाने, राकेश शिलेदार, शोभा शिलेदार हजर होते.