शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

देलनवाडी येथे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:36 IST

आरमोरी : तालुक्यातील देलनवाडी येथे गेल्या दोन महिन्यापासून नळाला बरोबर पाणी येत नसल्याने गावात पाण्याची गंभीर समस्या ...

आरमोरी : तालुक्यातील देलनवाडी येथे गेल्या दोन महिन्यापासून नळाला बरोबर पाणी येत नसल्याने गावात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गावकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे गावातील पाणी समस्या तत्काळ निकाली काढा, नाहीतर गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करा, अशी मागणी पंचायत समिती सदस्य किरण म्हस्के व गावकऱ्यांनी केली आहे.

देलनवाडी हे परिसरातील मध्यवर्ती ठिकाण आहे. या गावात विविध शासकीय कार्यालये आहेत. गावात जीवन विकास प्राधिकरण अंतर्गत नळ योजना कार्यान्वित झाली आहे. मात्र गेल्या दोन महिन्यापासून नळाला बरोबर पाणी येत नसल्याने गावात पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याचा वापर व गरज वाढली आहे. नळ योजना असूनही पाणी येत नसल्याने लोकांना पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे.

आता तेंदूपत्ता हंगाम सुरू आहे. त्यामुळे लोक जंगलातून तेंदूपाने गोळा करून आणल्यानंतर त्यांना भर उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्या अंगाची लाही-लाही होत आहे. मात्र याकडे ग्रामपंचायत सचिवाचे दुर्लक्ष होत आहे.

(बॉक्स)

- तर ट्रॅॅक्टरने पाणीपुरवठा करा

देलनवाडी येथे ऐन उन्हाळ्यात उद्भवलेली पाणी समस्या तत्काळ निकाली काढा, अन्यथा ट्रॅकरद्वारे गावात पाणीपुरवठा करा, अशी मागणी पंचायत समिती सदस्य किरण मस्के, दिगेश्वर धाईत, कामराज हर्षे, विठ्ठल गेडाम, नितीन नवहाते, शालिनी भांडारकर, सिंधू घोडमारे, ज्योती घोडमारे, रेखा धात्रक, कुंदा घोडमारे, मंदा धाईत आदींनी केली आहे.