शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
3
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
4
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
6
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
7
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
8
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
9
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
10
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
11
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
12
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
13
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
14
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
15
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
16
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
17
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
18
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
19
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
20
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha Election 2019; गडचिरोलीतील नागरिकांचे म्हणणे, दारु पिणारा आणि पाजणारा उमेदवार नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 17:20 IST

विधानसभा निवडणुकीतील दारूचा वापर टाळण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातल्या १२० ग्रामपंचायतींमधील २८७ गावांनी ग्रामसभेत ठराव घेतला आहे. त्यात दारू पिणारा आणि पाजणारा उमेदवार देऊ नये, अशी मागणीवजा अपेक्षा राजकीय पक्षांकडे केली आहे.

ठळक मुद्देदारूमुक्त निवडणुकीसाठी १२० ग्रामपंचायतींचा ठराव

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विधानसभा निवडणुकीतील दारूचा वापर टाळण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातल्या १२० ग्रामपंचायतींमधील २८७ गावांनी ग्रामसभेत ठराव घेतला आहे. त्यात दारू पिणारा आणि पाजणारा उमेदवार देऊ नये, अशी मागणीवजा अपेक्षा राजकीय पक्षांकडे केली आहे.गडचिरोलीत गेल्या तीन वर्षांपासून राबविल्या जात असलेल्या मुक्तिपथ अभियानाच्या पुढाकारातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे नागरिकांना दारूचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. त्यामुळे आतापर्यंत ६०० गावांनी दारूबंदीचा ठराव घेऊन गावात दारूला थारा न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी १२० ग्रामपंचायतींनी विधानसभा निवडणूकसुद्धा दारूमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी ग्रामसभेचा ठराव घेतला असल्याची माहिती ज्येष्ठ समाजसेवक डॉ.अभय बंग यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.गावकऱ्यांनी केलेल्या ठरावांमध्ये मुख्यत: तीन मुद्दे मांडले आहेत. त्यात राजकीय पक्षांनी उमेदवार देताना तो दारू पिणारा नसावा, उमेदवारांनी मतांसाठी दारू वाटू नये आणि मतदारांनी दारूच्या नशेत मतदान करू नये या मुद्यांचा समावेश आहे. हे ठराव सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या जिल्हा आणि प्रदेश अध्यक्षांकडे पाठविले असल्याचे डॉ.बंग यांनी सांगितले. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वेळी गडचिरोली-चिमूर मतदार संघातील पाचही उमेदवारांनी मतदारांना दारूचे वाटप करणार नाही अशी लेखी हमीच दिली होती. त्याचा बराच परिणामही दिसून आला. यावेळीही जे उमेदवार राहतील त्यांच्याकडून ही हमी घेण्याचा प्रयत्न मुक्तिपथकडून केला जाणार आहे.

जनभावनेचा आदर करावा- डॉ.बंगग्रामसभांनी अशा पद्धतीचे ठराव घेऊन निवडणुकीत दारूपासून दूर राहण्याचा निर्णय घेणे हा लोकशाहीचा विजय आहे. केवळ गडचिरोली जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील मतदारांनी याचा आदर्श घेतला पाहीजे. तसेच सर्व राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी जनभावनेचा आदर करत योग्य उमेदवार निवडणुकीत उतरवावे, असे आवाहन मुक्तिपथ अभियानाचे मार्गदर्शक आणि ‘सर्च’चे संचालक डॉ.अभय बंग यांनी केले.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019