शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

अपहृत बस सुटकेचा नागरिकांनी अनुभवला थरार

By admin | Updated: January 3, 2017 18:31 IST

ऑनलाइन लोकमत गडचिरोली, दि. 3 - अपहरण केलेल्या बसमधील प्रवाशांची पोलीस कशा पद्धतीने सुटका करतात, कोणत्या तंत्राचा अवलंब करतात, ...

ऑनलाइन लोकमतगडचिरोली, दि. 3 - अपहरण केलेल्या बसमधील प्रवाशांची पोलीस कशा पद्धतीने सुटका करतात, कोणत्या तंत्राचा अवलंब करतात, याविषयीचा डेमो गडचिरोली पोलिसांनी सादर केला. अपहरण झालेल्या बस सुटकेचा थरार यानिमित्ताने शहरवासीयांनी अनुभवला. 'पोलीस रेजिंग डे' निमित्त पोलिसांच्या वतीने स्थानिक इंदिरा गांधी चौकात डेमोचे आयोजन केले होते. ह्यपोलीस रेजिंग डेह्ण निमित्त गडचिरोली पोलिसांच्या वतीने जिल्हाभरात २ जानेवारीपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सदर कार्यक्रम ८ जानेवारीपर्यंत चालणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत पोलीस यंत्रणा कशा प्रकारे काम करते, हे सर्वसामान्य नागरिकांसाठी एक रहस्य आहे. याबाबींची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी, या उद्देशाने गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात मंगळवारी सकाळी ११ वाजता अपहरण केलेल्या बसमधील प्रवाशांची सुटका करण्यासाठी पोलिसांच्या वतीने कोणत्या तंत्राचा वापर केला जातो, बसला कशाप्रकारे थांबविले जाते, याचे प्रात्यक्षिक सादर केले.

सदर प्रात्यक्षिक बघून नागरिक आश्चर्यचकित झाले. नक्षल्यांकडून बसचे अपहरण करण्यात आले आहे. सदर बस आरमोरीवरून निघाल्याचे पोलिसांना माहित होते. त्यानुसार पोलीस इंदिरा गांधी चौकात या बसला अडविण्यासाठी सापळा रचतात. अपहरणकर्ता सहजासहजी बस थांबविणार नाही, ही बाब पोलिसांना पक्की माहित असल्याने अपहृत बसच्या अगदी समोर पोलिसांचे वाहन उभे केले जाते. त्यामुळे अपहृत बसचाचालक बस थांबवितो. त्याचवेळी लपून बसलेले सशस्त्र पोलीस जवान तत्काळ बसच्या दिशेने आगेकूच करतात व बसला घेराव घालतात. दोन ते तीन जवान तत्काळ बसमध्ये चढून प्रवाशांची सुटका करतात. तर अपहरणकर्त्यांनाही ताब्यात घेतले जाते. अपहरण केलेल्या बसमधील प्रवाशांची काय स्थिती असते, याचा थरार गडचिरोलीवासीयांनी अनुभवला. हा थरार बघून काहीकाळ नागरिकांच्या हृदयाचे ठोके चुकले.जवळपास १५ ते २० मिनीट चौकातील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे चारही मार्गावर वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. त्याचबरोबर सदर प्रात्यक्षिक पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी पोलीस उपअधीक्षक (गृह) गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, ठाणेदार विजय पुराणिक यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)