शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

तलावाच्या पाळीचे काम बंद केल्याने नागरिक संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 21:58 IST

चामोर्शी शहराच्या प्रभाग क्रमांक १२, १३ व १४ परिसरात दरवर्षीच्या उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. ही समस्या मार्गी लागावी, यासाठी प्रशासनातर्फे पावसाळ्यात फुटलेल्या नागोल तलावाची पाळ बांधकामास सुरूवात करण्यात आली. मात्र अर्धे काम झाल्यानंतर हे काम अचानक बंद पाडण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी २९ जून रोजी शनिवारला चामोर्शी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली.

ठळक मुद्देनिवेदन । तीन प्रभागातील नागरिकांची एसडीओ कार्यालयावर धडक

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : चामोर्शी शहराच्या प्रभाग क्रमांक १२, १३ व १४ परिसरात दरवर्षीच्या उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. ही समस्या मार्गी लागावी, यासाठी प्रशासनातर्फे पावसाळ्यात फुटलेल्या नागोल तलावाची पाळ बांधकामास सुरूवात करण्यात आली. मात्र अर्धे काम झाल्यानंतर हे काम अचानक बंद पाडण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी २९ जून रोजी शनिवारला चामोर्शी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली.नगर पंचायतीचे मुख्याधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन उपविभागीय अधिकारी विजया जाधव यांनी स्वीकारले. तर नगर पंचायत कार्यालयात मुख्याधिकारी संजय गंगथडे यांनी निवेदन स्वीकारले. निवेदन देताना पी. जे. सातार, एच. डब्ल्यू. उत्तरवार, कोपेश्वर लडके, एस. एस. घागरे, व्ही. एन. सालेकर, आर. जी. वासेकर, के. डी. बोबाटे, आर. एन. धोडरे, संजय कुनघाडकर, महेंद्र वासेकर, कालिदास बुरांडे, गजानन बारसागडे आदीसह साधूबाबा नगर प्रभाग क्रमांक १३, गणेश नगर प्रभाग क्रमांक १२ व १३, प्रभाग क्रमांक १३ मधील आॅफीसर कॉलनी तसेच प्रभाग क्रमांक १५ मधील गायत्री नगरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.येत्या सोमवारपासून तलावाच्या पाळीचे काम पूर्ववत सुरू करण्याबाबतची माहिती आपण नगराध्यक्षांना दिली असून या पाळीचे बांधकाम पूर्ण करण्यात येईल, असे नगर पंचायतीचे मुख्याधिकारी तथा तहसीलदार संजय गंगथडे यांनी नागरिकाच्या शिष्टमंडळांना चर्चेदरम्यान सांगितले.६ जुलैला मोर्चा काढणारसाधूबाबा नगराजवळील नागोल तलावाच्या पाळीचे बांधकाम सुरू करून ते पूर्ण करण्यात यावे, अन्यथा ६ जुलै रोजी नगर पंचायत कार्यालयावर मोर्चा काढणार, असा इशारा साधूबाबा नगर, गणेश नगर, गायत्री नगर व आॅफीसर कॉलनीतील नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे. निवेदनाची प्रत जलसंपदामंत्री, विरोधी पक्ष नेते, खासदार व आमदारांना पाठविण्यात आली आहे.