शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

आलापल्ली, नागेपल्लीत धुरामुळे नागरिक त्रस्त

By admin | Updated: April 13, 2017 02:43 IST

आलापल्ली वन विभागाअंतर्गत येत असलेल्या आलापल्ली वनपरिक्षेत्रातील शेकडो हेक्टर जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला

आलापल्ली : आलापल्ली वन विभागाअंतर्गत येत असलेल्या आलापल्ली वनपरिक्षेत्रातील शेकडो हेक्टर जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला असून यामुळे आलापल्ली व नागेपल्ली परिसरातील गावात मोठ्या प्रमाणावर धूर पसरला आहे. त्यामुळे नागरिकांच्या डोळ्यांना जळजळ होण्याचा त्रास वाढला आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून आलापल्लीच्या परिसरातील जंगलात आग मोठ्या प्रमाणावर पसरली असून ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आलापल्ली वन विभागात दरवर्षी तेंदू तोडणी हंगाम सुरू होण्या व्हायच्या आधी दरवर्षी साधारणत: मार्च, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला जंगलाला आगी लागण्याच्या घटना घडतात. तेंदूच्या झाडाला मोठ्या प्रमाणावर नवीन व दर्जेदार पाने फुटतात, असा या मागे तर्क आहे. मात्र या आगीमुळे पक्षी, प्राणी, सरपटणारे जनावरे यांना प्रचंड त्रास होत आहे. अनेक पशु, पक्षी या आगीच्या लोळात मारलेही जातात. वन विभागाचे अनेक कर्मचारी आग आटोक्यात आणण्यासाठी नित्याने प्रयत्न करीत असले तरी आगी लागण्याचे प्रमाण मोठे असल्याने त्यांनाही आगी विझविण्यासाठी कुठे-कुठे जावे, हा प्रश्न निर्माण होतो. वरिष्ठ अधिकारी मात्र या आगीच्या घटनांकडे फार गांभीर्याने लक्ष देत नाही. उलट त्यांनी कनिष्ठ कर्मचाऱ्यांवरच आग लागल्यास कारवाई करू, असा दम दिलेला आहे. त्यामुळे आग विझविण्याचे काम करणारे कर्मचारी प्रचंड मानसिक तणावात असल्याचे दिसून येत आहे. आलापल्ली वनपरिक्षेत्रात सुनील प्रेमानंद बिश्वास रा. कांकेर, जि. करेनर (छत्तीसगड) याला अटक करण्यात आली. त्याला परप्रांतीय तेंदू ठेकेदारांनी आणले होते. हे जवळपास स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे अहेरी वनपरिक्षेत्रातही जंगलाला आग लावताना प्रभाष गोपाल मंडल, आशितोष किशोर कोरेत रा. अहेरी या दोघांना अटक करण्यात आली. स्थानिक नागरिकांचाही सहभाग आग लावण्यात असल्याचे स्पष्ट झाले. जंगलातील आगीमुळे आलापल्ली, नागेपल्ली भागात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरले आहेत. त्यामुळे नागरिकांना डोळ्यांचा जळजळीचा त्रास मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. वन विभागाने यासंदर्भात तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात आलापल्लीचे वनपरिक्षेत्राधिकारी किरण पाटील यांच्या भ्रमणध्वनीवर प्रतिक्रियेसाठी संपर्क केला मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. आग वाढत असल्याने जंगलाला धोका होण्याची शक्यता असून नागरिकांनाही डोळ्यांचा त्रास व आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (वार्ताहर)