शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

धानोरा तालुक्यातील आरोग्य सेवेवर मंथन

By admin | Updated: March 22, 2017 02:25 IST

स्पर्श संस्थेच्या वतीने धानोरा येथील किसान भवनात तालुकास्तरीय आरोग्य हक्क जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

समस्या सोडविण्याचे सभापतींचे आश्वासन : रांगी, कारवाफा, मुरूमगाव केंद्रांबाबत व्यक्त केली चिंता धानोरा : स्पर्श संस्थेच्या वतीने धानोरा येथील किसान भवनात तालुकास्तरीय आरोग्य हक्क जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सभेत रांगी, कारवाफा व मुरूमगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरावस्थेवर चर्चा करण्यात आली. जनसंवाद सभेच्या अध्यक्षस्थानी धानोरा पंचायत समितीचे सभापती अजमन राऊत उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून उपसभापती अनुसया कोरेटी, पंचायत समिती सदस्य विलास गावडे, सदस्य कविता मंटकवार, नगराध्यक्ष वर्षा चिमुरकर, भाऊसाहेब अहीर, आम्ही आमच्या आरोग्यासाठीच्या संचालक शुभदा देशमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश मडावी उपस्थित होते. डॉ. दिलीप बारसागडे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील निवासस्थानांची दैनावस्था, जननी सुरक्षा लाभ योजनेंतर्गत डावलण्यात येणारा आर्थिक लाभ, आरोग्य सेवकांची दवाखान्यातील अनुपस्थिती, आशा वर्करला मिळणारे अत्यल्प मानधन आदी मुद्दे मांडले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मडावी, डॉ. गौरशेट्टीवार, डॉ. पाटील, डॉ. पुंगाटी, डॉ. जाधव यांनी नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. धानोरा तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे पंचायत समितीचे सभापती अजमन राऊत यांनी सांगितले. शुभदा देशमुख यांनी आरोग्य सेवांवर लोकाधारित देखरेख व नियोजन प्रक्रियेचे महत्त्व यावर प्रकाश टाकला. संचालन सुकलू कोरेटी तर आभार सचिन जेठी यांनी मानले. यशस्वीतेसाठी हरीराम धुर्वे, पवन ठाकरे, मनोज तुलावी, अमोल सहारे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)