शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

चांदाळात चौकाचे झाले नामकरण

By admin | Updated: November 9, 2016 02:37 IST

ठाकूर रामप्रसाद पोटाई यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून गोंडवाना गोंडी संस्कृती बचाव समितीच्या वतीने रविवारी आयोजित

गोंडवाना बचाव समितीतर्फे कार्यक्रम : ठाकूर रामप्रसाद पोटाई यांचे दिले नावगडचिरोली : ठाकूर रामप्रसाद पोटाई यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून गोंडवाना गोंडी संस्कृती बचाव समितीच्या वतीने रविवारी आयोजित कार्यक्रमात चांदाळा टोला येथील मुख्य चौकाचे ठाकूर रामप्रसाद पोटाई असे नामकरण करण्यात आले. चांदाळा टोला येथील मुख्य चौकाचे संविधान सभेचे सदस्य असलेल्या ठाकूर रामप्रसाद पोटाई यांचे नाव या चौकाला देण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रदेशाध्यक्ष वासुदेवशहा टेकाम होते. उद्घाटक म्हणून माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी तर प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष श्यामकांत मडावी, जिल्हाध्यक्ष संदीप वरखडे, मुर्सेनाल खुशालसिंह सुरपाम, गोंडीधर्म बचाव समितीचे अध्यक्ष मनिरावण दुग्गा, अ‍ॅड. सुखरंजन उसेंडी, साहित्यिक नंदकिशोर नैताम, प्रा. मधुकर उईके, आरखी, चांदाळा आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका यशोधरा उसेंडी, बिच्चु वड्डे, सरपंच राजेंद्र मेश्राम, श्रीराम नैैताम, डॉ. पीतांबर कोडापे, गोपाल नैैताम, बालविकास अधिकारी मुनेश्वर करंगामी, क्रांती केरामी आदी मान्यवर उपस्थित होते. सहावी व सातवी अनुसूचि भारतीय संविधानात लागू करण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे, असे ठाकूर रामप्रसाद पोटाई यांचे नाव चांदाळा टोला येथील मुख्य चौकाला देण्यात आले. त्यांच्या नावाचा फलकही लावण्यात आला. याप्रसंगी वासुदेवशहा टेकाम म्हणाले, गोंडवानाच्या पुनरूत्थानासाठी गोंडवाना राज्याची निर्मिती व्हावी, याकरिता संविधान निर्मितीकरिता रामप्रसाद पोटाई यांनी भरीव कार्य केले, असे त्यांनी सांगितले. गोंडी संस्कृती ही या देशाची आद्य संस्कृती आहे. तिचे संवर्धन होणे काळाची गरज आहे, असे श्यामकांत मडावी यांनी सांगितले. गोंडी संस्कृतीचे पालन प्रत्येकाने आचरणात आणावे, रामप्रसाद पोटाई यांचा भारतीय संविधान बनविण्यात मोठे योगदान आहे. त्यांच्या कार्याची पे्ररणा घेऊन आदिवासी बांधवांनी जीवनात वाटचाल करावी, असे माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी भाषणातून सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकिशोर नैैताम, संचालन गणेश हलामी यांनी केले तर आभार उत्तम आतला यांनी मानले. यशस्वीतेसाठी ग्रामस्थांनी सहकार्य केले. चांदाळा परिसरातील हजारो आदिवासी बांधव हजर होते. (स्थानिक प्रतिनिधी)