शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी गावात आलेला चितळ ठार

By admin | Updated: April 12, 2017 01:06 IST

येथील वीज वितरण कंपनी कार्यालयालगत असलेल्या आंबे तलावात पाण्याच्या शोधात तहाण भागविण्यासाठी आलेला ....

पाणवठे कोरडे : उष्णतामानाने होरपळताहेत वन्यजीव वैरागड : येथील वीज वितरण कंपनी कार्यालयालगत असलेल्या आंबे तलावात पाण्याच्या शोधात तहाण भागविण्यासाठी आलेला चितळ जखमी झाल्याची घटना ९ एप्रिल रोजी रविवारला सकाळी १० वाजताच्या सुमारास वैरागड वन क्षेत्रात घडली. या चितळाचा दोन दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला.वीज वितरण कार्यालय लगतच्या आंबे तलावात तहाण भागविण्यासाठी आलेल्या चितळाची कोणी तरी शिकार करण्याच्या प्रयत्नात चितळाला दगड मारून जखमी केले. उपचारादरम्यान दोन दिवसांनी चितळ ठार झाला. जंगलातील पाणवठे कोरडे पडल्याने पाण्याच्या शोधात येणाऱ्या वन्य प्राण्यांना जीव गमवावा लागत आहे. ९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास वैरागड वन क्षेत्रातील कक्ष क्रमांक ७४२ मध्ये जखमी अवस्थेत पडून असलेला १० महिने वयाचा चितळाचा पाडस काही व्यक्तींच्या दृष्टीस पडला. संबंधित व्यक्तीने याबाबतची माहिती वन विभागाला दिली. वैरागड येथील क्षेत्र सहायक मेश्राम, वनरक्षक श्रीकांत सेलोटे यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून जखमी चितळाला बेस्ट स्टेशनला आणले. मात्र वैरागडचे पशुधन विकास अधिकारी नसल्याने या जखमी चितळावर उपचार करण्यासाठी दुपारचे २ वाजले. चितळाच्या पाठीवरचा हाड मोडला असल्याने दोन दिवसांच्या उपचारानंतर चितळाचा मृत्यू झाला. सध्या वैरागड, मानापूर, सुकाळा, कुरंडी, मोहझरी परिसरात मोठ्या प्रमाणात जंगलाला आगी लागल्या आहेत. या आगीत वन्यजीव त्याच ठिकाणी होरपळून मरतात. अथवा जीवाच्या आकांताने सैरावैरा पळत सुटतात. अशावेळी मोकळ्या जागेचा अथवा लोकवस्तीचा वन्यप्राणी आसरा घेतात. मात्र अशा ठिकाणी सुध्दा वन्यप्राण्यांची शिकार केली जाते. वैरागड जंगलात जखमी झालेल्या चितळाबाबत असाच प्रकार घडला असल्याची शक्यता आहे. (वार्ताहर)