शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:23 IST

दारूचे दुष्परिणाम लक्षात घेता विविध संघटना, राजकीय पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी आंदोलन छेडून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू केली ...

दारूचे दुष्परिणाम लक्षात घेता विविध संघटना, राजकीय पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी आंदोलन छेडून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू केली होती. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांचा त्रास कमी झाला होता. भांडण-तंट्यांचे प्रमाण घटले होते. मात्र, काही राजकीय नेत्यांनी चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी उठविण्याचा अट्टहास धरून दारूबंदी उठवली. महसुलाचा मुद्दा पुढे करून दारूबंदी उठविल्यामुळे फक्त शासनाचा व मूठभर दारूविक्रेत्यांचाच फायदा झाला. मात्र, जनतेचे काय? असा विचार राज्य शासनाने न करताच हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात कोरची तालुक्यातील ७९ गावांनी पुढाकार घेत निषेध ठराव घेतला आहे.

गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी लागू आहे. तसेच चोरट्या मार्गाने अवैध दारू विक्रीवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनास गाव संघटन सहकार्य करीत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात दारूची अवैध वाहतूक होईल. परिणामी या निर्णयाचा धक्का गडचिरोली जिल्ह्याला देखील बसणार आहे. त्यामुळे कोरची तालुक्यातील ७९ गावांनी ठराव घेत गाव संघटनेच्या निवडक प्रतिनिधींच्या हस्ते तहसीलदार भंडारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले.