शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेचा मंत्र देण्यासाठी रथ दाखल

By admin | Updated: November 9, 2016 02:33 IST

वैैराग्यमूर्ती गाडगेबाबांनी संपूर्ण जीवनभर स्वच्छतेच्या कामासाठी आपले आयुष्य झोकून दिले.

दहा गावांना दिल्या भेटी : गाडगेबाबांचा संदेश गावागावांत पोहोचविणारदेसाईगंज : वैैराग्यमूर्ती गाडगेबाबांनी संपूर्ण जीवनभर स्वच्छतेच्या कामासाठी आपले आयुष्य झोकून दिले. या महापुरूषाचा स्वच्छतेचा संदेश घेऊन सध्या स्वच्छता चित्ररथ गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून सोमवारी हा चित्ररथ मुरखळा येथे पोहोचला. त्यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल यांनी या रथाचे पूजन केले. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत माळी, सरपंच संदीप बोरकुटे, संवर्ग विकास अधिकारी पचारे आदी उपस्थित होते. कला पथकाच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश परिसरातील नागरिकांना देण्याचे काम करण्यात येत आहे. त्यानंतर सायंकाळी गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात स्वच्छतेचा जागर केल्यानंतर हा चित्ररथ मंगळवारी आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव, देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथे दाखल झाला. बीएमझेड ५३४१ क्रमांकाचे वाहन तत्कालीन महाराष्ट्र शासनाने गाडगेबाबांना दिले होते. या वाहनातच गाडगेबाबांचे निधन झाले. तो दिवस २० डिसेंबर १९५६ होता. याच वाहनावर हा चित्ररथ तयार करण्यात आला आहे. गाडगेबाबांच्या स्मृती जपण्यासाठी महाराष्ट्र ग्राम व जलसंधारण विभागातर्फे या रथाच्या माध्यमातून गावागावांत स्वच्छता व लोकांच्या मनाचेही परिवर्तन करण्याचे काम केले जात आहे. स्वच्छताविषयावर नागरिकांशी थेट संवाद साधण्याचे काम या चित्ररथाच्या माध्यमातून शासनाचे अधिकारी करीत आहेत. देसाईगंज मार्ग हा चित्ररथ मंगळवारी गोंदिया जिल्ह्यात रवाना झाला. (प्रतिनिधी)