शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

सिराेंचाच्या शाळेचा प्रभार चिमूरच्या मुख्याध्यापिकेकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:38 IST

सिरोंचा जिल्हा गडचिरोली येथे समाजकल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती (नवबौद्ध) मुलींची निवासी शाळा ही सन २०१३ पासून चालविली जात आहे. ...

सिरोंचा जिल्हा गडचिरोली येथे समाजकल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती (नवबौद्ध) मुलींची निवासी शाळा ही सन २०१३ पासून चालविली जात आहे. या शाळेत १९ पदे मंजूर असून, फक्त चार पदे भरलेली आहे. त्यातच मुलींची शाळा असून ही येथे कायमस्वरूपी एकही महिला कर्मचारी नाही. तात्पुरत्या स्वरूपात विभागाने येथे महिला मुख्याध्यापिकेची प्रतिनियुक्ती केली आहे. परंतु महिला मुख्याध्यापिकेकडे सिरोंचा आणि चिमूर या दोन्ही शाळेच्या कार्यभार सोपविण्यात आला आहे. सिरोंचा येथे महिला मुख्याध्यापिकेची गरज असतानाही चिमूर येथील अतिरिक्त पदभार देण्याचा अजब गजब कारभार प्रादेशिक उपायुक्त नागपूर यांनी केला आहे. शाळा मुलींची निवासी असल्यामुळे कायमस्वरूपी मुख्याध्यापिका, अधीक्षिका आणि दोन ते तीन महिला शिक्षिका शाळेला द्याव्यात कोणाकडेही चार्ज देऊन ही पदे भरली जाऊ नये अशी सिरोंचा येथील पालकांची मागणी आहे महिला कर्मचाऱ्यांचा मागणीसाठी वारंवार आयुक्त, प्रादेशिक उपायुक्त, सहायक आयुक्त समाजकल्याण यांना निवेदने देऊनही या शाळेच्या समस्यांकडे विभागाकडून जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे. मागणी पूर्ण न झाल्यास शाळा बंद आंदोलन करून मानवाधिकार आयोगात तक्रार दाखल करण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.