काँग्रेस नेत्यांची हजेरी : तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावरकुरखेडा : तालुक्यातील १२३ गावांची अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असताना दोनच गावांना दुष्काळी मदत जाहीर करण्यात आली आहे. हा शेतकऱ्यांवरील फार मोठा अन्याय असून १२३ गावांना दुष्काळग्रस्त घोषीत करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, या मुख्य मागणीसाठी कुरखेडा तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने कुरखेडा-देसाईगंज या मुख्य मार्गावर दोन तास चक्काजाम आंदोलन गुरूवारी करून शेकडो शेतकऱ्यांनी निदर्शने केली.गोदामाची व्यवस्था नसल्याचे कारण पुढे करीत प्रशासनाने कुरखेडा तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत निम्मेच धान खरेदी केंद्र सुरू केले. सदर धान खरेदी केंद्रांवर मागील आठ दिवसांपासून बारदान्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे धान खरेदी ठप्प पडली आहे. त्यामुळे बारदान्याचा पुरवठा करण्यात यावा, धानाचे थकीत चुकारे तत्काळ देण्यात यावी, बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, पीक कर्ज माफ करावे, कृषी वीज बिल माफ करावे, रोहयोची कामे सर्वच गावांमध्ये सुरू करावे आदी मागण्यांसाठी काँग्रेसच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. कुरखेडा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येऊन दोन तास चक्काजाम आंदोलन केले. त्याचबरोबर शासनाच्या विरोधात निदर्शनेसुध्दा दिली. कुरखेडाचे तहसीलदार उत्तमराव तोडसाम यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांसोबत चर्चा केली व मागण्यांचे निवेदन स्वीकारले. यातील बहुतांश मागण्या शासनस्तरावरील असल्याने या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण पाठपुरावा करू, असे आश्वासन तहसीलदारांनी दिले. त्यानंतर चक्काजाम आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम, प्रदेश सरचिटणीस हसनअली गिलानी, जि.प. उपाध्यक्ष जीवन नाट, माजी सभापती परसराम टिकले, माजी जि.प. सदस्य पुंडलिक आकरे, पं.स. सदस्य प्रभाकर तुलावी, माजी सरपंच महादेव पुंगळे, नवनाथ धाबेकर, जयंत हरडे, पं.स. सभापती शामिना उईके, न.प. उपाध्यक्ष जयश्री धाबेकर, सभापती आशा तुलावी, नगरसेवक उस्मान पठाण, मनोज सिडाम, अरूण उईके, महादेव नाकाडे, अमोल पवार, बंडू मुंगनकर, धर्मदास उईके, सुधाकर भेंडे, आनंदराव जांभुळकर, संजय कोरेटी, दयाराम कवडो, सा. बू. पठाण, धनराज लाकडे, ईश्वर ठाकरे, मधुकर वारजुरकर, आबीद पठाण, संजय नाकतोडे, जावेद शेख, निजाम शेख, नाना इंदुरकर, शामराव कोवाची, सुभाष सपाटे, दिलीप घोडाम, विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, जनाबाई उसेंडी, दामोधर वट्टी, कोमेश धोंडणे, तुकाराम मारगाये, ऐनिदास कवरके, गिरीधर तितराम, हरिराम चुरगाये, नरेश दहीकर, संजय वड्डे, अग्रसिंह खडाधार, भगवान नागपुरकर, रेवनाथ नाकाडे, माधव दहीकर, सिंधूबाई तितीरमारे, शोभा तुलावी, प्रल्हाद कोल्हे, सोनू देशमुख, हर्षवर्धन मडावी, पंढरी डोंगरवार, बाबुराव कवडो यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)
कुरखेड्यात चक्काजाम
By admin | Updated: February 5, 2016 00:58 IST