शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

आष्टीत अवैध वाहतुकीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 05:00 IST

सुधीर फरकाडे । लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी : महाराष्ट्रात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली ...

ठळक मुद्देपोलिसांचा कडक पहारा । चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर लागले कॅमेरे

सुधीर फरकाडे ।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : महाराष्ट्रात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. परिणामी लॉकडाऊन पुन्हा कडक करण्यात आले असून रेडझोनमधील नागरिक व दुसºया जिल्ह्यातील नागरिकांना मज्जाव करण्यासाठी पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक अहेरी व उपविभागीय अधिकारी अहेरी यांच्या मार्गदर्शनात आष्टीचे पोलीस निरीक्षक रजनिश निर्मल यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहे.परजिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या नागरिकांवर व आवागमन करणाऱ्या वाहनांवर या सीसीटीव्ही कॅमेºयाची नजर राहणार आहे. चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरून केवळ भाजीपाला, किराणा, औषधी, अंडी, दूध, मांस, मटन, बी-बियाणे व किटनाशक व शेतीपयोगी साहित्य ने-आण करण्याची परवानगी आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक रजनिश निर्मल यांनी दिली आहे. ई-पास मिळविणाºया नागरिकांना प्रवेश दिला जात आहे.चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर आष्टी येथे पोलीस अधिकारी व पाच कर्मचारी २४ तास ठाण मांडून बसलेले आहेत. त्यामुळे विनापरवाना वाहनांची कडक तपासणी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जात आहे. काही नागरिक रुग्णवाहिकेचा आधार घेऊन विनापरवाना जिल्ह्यात प्रवेश करीत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे रुग्णवाहिकेची कडक तपासणी केली जात आहे. येथील आंबेडकर चौकातही सीसीटीव्ही कॅमेरे यापूर्वीच लावण्यात आले आहेत. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांचे आवागमन वारंवार होत असेल तर अशा वाहनांवर पोलीस कारवाई करीत आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून अवैध वाहतुकीचे चित्रीकरण केले जात आहे. ठाणेदार निर्मल हे कक्षातील टीव्हीमध्ये फुटेजची तपासणी करीत आहेत.घाटकूर मार्गाच्या जिल्हा सीमेवर तगडा बंदोबस्तकोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर आष्टी येथे पहिल्यांदाच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. त्यामुळे परजिल्ह्यातून विनापरवाना प्रवेश करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. याशिवाय घाटकूर मार्गे जाणाºया जिल्हा सीमेवरही तगडा पोलीस बंदोबस्त आहे. त्यामुळे येथूनही नागरिकांना प्रवेश करता येणार नाही. सीसीटीव्ही कॅमेरे व पोलिसांची करडी नजर चुकवून जिल्ह्यात प्रवेश करणाºया नागरिकांना कारवाईला सामोरे जावे लागत आहे.

टॅग्स :cctvसीसीटीव्ही