शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

सरकारीसाेबतच दाेन खासगी रुग्णालयांमध्ये काेराेनाची लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 05:00 IST

गडचिराेली जिल्ह्यात ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेले जवळपास २ लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. या सर्वांना जिल्हाभरातील सरकारी दवाखान्यांमध्ये माेफत काेराेना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध हाेणार आहे. काही नागरिक मात्र सरकारी दवाखान्यात जाऊन लस घेण्यास इच्छुक नाहीत, अशा नागरिकांना खासगी रुग्णालयांमध्ये लस घेण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी मात्र २५० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.

ठळक मुद्देसरकारी दवाखान्यात फ्री, तर खासगीत माेजावे लागणार २५० रुपये

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व आजाराने ग्रस्त असलेल्या ४५ वर्षे वयावरील नागरिकांना आता जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांसाेबतच गडचिराेली शहरातील धानाेरा मार्गावरील सिटी हाॅस्पिटल व चामाेर्शी मार्गावरील धन्वंतरी हाॅस्पिटल या दाेन खासगी रुग्णालयांमध्ये १ मार्चपासून काेराेना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध हाेणार आहे. याबाबतचे नियाेजन जिल्हा आराेग्य विभागाने करण्यास सुरुवात केली आहे. गडचिराेली जिल्ह्यात ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेले जवळपास २ लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. या सर्वांना जिल्हाभरातील सरकारी दवाखान्यांमध्ये माेफत काेराेना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध हाेणार आहे. काही नागरिक मात्र सरकारी दवाखान्यात जाऊन लस घेण्यास इच्छुक नाहीत, अशा नागरिकांना खासगी रुग्णालयांमध्ये लस घेण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी मात्र २५० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. केंद्र शासनाने देशभरातील खासगी रुग्णालयांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये गडचिराेली शहरातील सिटी हाॅस्पिटल व धन्वंतरी हाॅस्पिटल यांचा समावेश आहे. ही दाेन्ही रुग्णालये यापूर्वी महात्मा फुले जनआराेग्य याेजनेशी संलग्नित हाेती. 

ऑन द स्पाॅट किंवा ॲपवर करता येणार नाेंदणीकाेराेनाची लस घेण्यासाठी संबंधित व्यक्तीची नाेंदणी हाेणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने स्वतंत्र ॲप तयार केले आहे. तसेच ज्या रुग्णालयात लस घ्यायची आहे, त्या ठिकाणी स्वतंत्र केंद्र तयार केले जाणार आहे. त्या ठिकाणीसुद्धा नाेंदणी करता येणार आहे. 

नाेंदणी करतेवेळी वयाचा दाखला म्हणून आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, जन्मदाखला आदी प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहेत. इतरही कागदपत्रे चालतील. त्याची यादी प्रसिध्द केली जाणार आहे.

व्याधीने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला त्याबाबतचे डाॅक्टरांचे नुकतेच काढलेले प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले आहे. २० प्रकाराच्या आजारांचा समावेश करण्यात आला आहे. ते काेणते आजार आहेत, याची माहिती आराेग्य विभागाकडे उपलब्ध हाेणार आहे. 

मंगळवारपासून लसीकरणाला येणार गतीकेंद्र शासनाने १ मार्चपासून म्हणजेच साेमवारपासून लस उपलब्ध हाेईल, असे जाहीर केले आहे. मात्र, याबाबतचे नियाेजन करण्यास उशीर लागू शकतो. त्यामुळे साेमवारी दुपारनंतर लस उपलब्ध हाेऊ शकेल. मंगळवारपासून लसीकरणाला गती येईल, अशी माहिती आराेग्य विभागाने दिली आहे. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस