शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध आजीवर नातवांच्या संगोपनाची धुरा

By admin | Updated: August 20, 2016 01:25 IST

पर्लकोटा नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या मुन्ना तलांडी यांचा मृतदेह १३ दिवसांचा कालावधी उलटूनही मिळाला नाही.

मुन्ना तलांडीची मुले झाली निराधार : कुटुंबीय शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत रमेश मारगोनवार भामरागड भामरागड : पर्लकोटा नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या मुन्ना तलांडी यांचा मृतदेह १३ दिवसांचा कालावधी उलटूनही मिळाला नाही. मृतदेह न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबाला शासकीय मदत मिळण्यात अडचण निर्माण होत आहे. मुन्नाची पत्नी दोन वर्षांपूर्वीच माहेरी निघून गेली. मुन्नाही पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्यामुळे मुन्ना तलांडीची मुले निराधार झाले असून वृद्ध आजीवर त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी आली आहे. पर्लकोटा नदीला ७ आॅगस्ट रोजी पूर आला होता. पुरामुळे मुन्ना तलांडी हा हेमलकसा येथे अडकला होता. सतत चार दिवस मुलांपासून दूर राहल्यामुळे मुन्ना तलांडी त्रस्त झाला होता. मुलांची आठवण त्याला स्वस्थ बसू देत नसल्याने पर्लकोटा नदीचा पूर पोहून जाण्याचा धाडसी निर्णय तलांडीने घेतला. पर्लकोटा नदीच्या पुलावरून कंबरभर पाणी वाहत असताना त्याने नदी पात्रात उडी घेतली. नदी किनाऱ्यावरच्या नागरिकांना मुन्ना नदीपात्रात बऱ्याच अंतरावर पोहतांना दिसला. त्यानंतर काही दूर अंतरावरून तो अचानक गायब झाला. तेव्हापासून १३ दिवसांचा कालावधी उलटूनही त्याचा मृतदेह पोलीस प्रशासनाच्या हातात लागला नाही. मृतदेह मिळाल्याशिवाय त्याला प्रशासन मृतक घोषित करण्यास नकार देत आहे. त्यामुळे त्याच्या निधनानंतर जी मदत मुन्नाच्या कुटुंबाला मिळायला पाहिजे होती ती मिळण्यास अडचण जात आहे. पोलिसांनीही त्याचा शोध थांबविला आहे. मात्र मुन्नाची वृद्ध आई व त्याचे नातेवाईक इंद्रावती नदीच्या पात्रात त्याच्या मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र अजुनपर्यंत त्याचा मृतदेह हाती लागलेला नाही. मुन्नाची मोठी मुलगी साक्षी ही सातव्या वर्गात शिकत आहे. तर दुसरा मुलगा सतीश हा दुसऱ्या वर्गात शिकत आहे. मुन्नाची पत्नी दोन वर्षांपूर्वी माहेरी निघून गेली. वडीलही पुराच्या पाण्यात वाहून गेले. त्यामुळे मुन्नाचे दोन्ही मुले निराधार झाले आहेत. वृद्ध आजी त्यांचा संगोपन सध्य:स्थितीत करीत आहे. आईवडिलांविना जीवन जगण्याची पाळी साक्षी व सतीशवर आली आहे. मुन्नाचे कुटुंब मुन्नाच्या मोलमजुरीवरच्या उत्पन्नावरच जगत होते. मात्र मुन्नाच्या जाण्याने कुटुंबाचे उत्पन्नाचे साधनच संपले आहे. त्यामुळे त्याच्या मुलांवर व आईवर उपासमारीची पाळी आली आहे. मृतदेह न मिळाल्याने शासकीय मदतीची दारेसुद्धा सध्य:स्थितीत बंद झाली आहेत. त्यामुळे तिघांचेही जगणे कठिण झाले असून सदर कुटुुंब मदतीची अपेक्षा करीत आहेत. म्हातारपणात मजुरी करून स्वत:चेच पोट भरणे अशक्य असतानाच आता नातवांचेही पोट भरण्याची जबाबदारी वृध्द आजीवर आली आहे. तिघेही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.