काेराेना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने गावखेड्यातही भीतीचे वातावरण आहे. अनेक जण काेराेना चाचणी करण्यासाठी प्राथमिक आराेग्य केंद्रात जात नसल्याने घारगाव येथे शिबिर घेऊन काेराेना चाचणी करण्यात आली. यात गावातील १२ जण पाॅझिटिव्ह निघाले. त्यांना जिल्हा परिषद शाळेत विलगीकरण कक्ष तयार करून ठेवण्यात आले. चाचणी व लसीकरण शिबिरासाठी जिल्हा परिषद सदस्या कविता भगत, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष प्रमोद भगत, सरपंच विवेक भगत, उपसरपंच कबीर आभारे, पोलीस पाटील ठेमाजी आभारे यांनी पुढाकार घेऊन गावातील सर्व नागरिकांची कोरोना चाचणी करण्यास सहकार्य केले. भेंडाळा आरोग्य केंद्रातील आराेग्य पथकाने नमुने घेतले. गावातच लसीकरण व कोरोना तपासणी करण्यात आल्याने गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
घारगावात काेराेना टेस्ट व प्रतिबंधात्मक लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:37 IST