शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांनी घेतला दिलेल्या निधीचा हिशोब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:37 IST

पालकमंत्री शिंदे यांनी जिल्ह्यात विविध विषयांचा आढावा घेतला. यामध्ये कोरोना, आरोग्य सुविधा, धान खरेदी व साठवणूक, शेती संलग्न विषय, ...

पालकमंत्री शिंदे यांनी जिल्ह्यात विविध विषयांचा आढावा घेतला. यामध्ये कोरोना, आरोग्य सुविधा, धान खरेदी व साठवणूक, शेती संलग्न विषय, वीज समस्या व नियोजनामधील कामांची सद्य:स्थिती यांचा समावेश होता. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार कृष्णा गजबे, आमदार डॉ. देवराव होळी, भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर, नगराध्यक्ष योगिता पिपरे व तालुका, तसेच जिल्हास्तरावरील सर्व विभाग प्रमुख ऑनलाइन स्वरूपात उपस्थित होते.

जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जिल्ह्यातील प्रमुख शहरात ऑडोटोरियम उभारण्यासाठी लागणारा निधी व कामांसाठीचा प्रस्ताव तयार केल्याची माहिती दिली. यातून चांगल्या प्रकारे ऑडोटोरियम जिल्ह्यात उभारण्यात येणार असून, त्यासाठी अंदाजे १०५ कोटी रुपये लागणार आहेत. सदर प्रस्तावाबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीआधी पालकमंत्र्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील नूतनीकरण केलेल्या शस्रक्रिया विभागाचे लोकार्पण केले. यावेळी त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या इतर सुधारणांची प्रत्यक्ष पाहणी केली. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातून ऑनलाइन स्वरूपात विविध विभागांचा त्यांनी आढावा घेतला. विकास कामांबाबत विभाग प्रमुखांना सूचनाही केल्या. यावेळी उपस्थित आमदारांनी आपापल्या क्षेत्रातील विकास कामांचे प्रस्ताव व अडचणी पालकमंत्र्यांकडे मांडल्या. यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही शिंदे यांनी संबंधित प्रशासनाला दिले.

प्रलंबित प्रस्तावांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश

जिल्ह्यातील विविध कामांबाबत आढावा घेत असताना आलेल्या अडचणींबाबत पालकमंत्री शिंदे यांनी राज्यस्तरावर प्रलंबित असलेल्या प्रस्तावांबाबत विविध विभागाचे सचिव, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठकीतूनच संवाद साधला. ते प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यामध्ये कोरची तालुक्यातील नवीन वीज जोडणी, मत्स्य शेती, धान साठवणूक गोदामे व दुरुस्ती या कामांचा प्रामुख्याने समावेश होता.

कोरोनाबाबत अधिक खबरदारी घ्या

कोरोनाबाबत सर्व संबंधित यंत्रणांचा आढावा घेत असताना पालकमंत्र्यांनी आता अधिक खबरदारी घेण्याची गरज असून, संसर्ग रोखण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन केले. संपूर्ण राज्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातही वाढ निदर्शनास येत आहे. आता पुन्हा सर्व शासकीय यंत्रणांनी मागील कालावधीत केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती करावी, असे पालकमंत्री म्हणाले.

मत्स्य शेती, स्ट्रॉबेरी व जांभूळ या प्रकल्पांकडे लक्ष वेधले

जिल्ह्यात शेतीमध्ये आधुनिक शेती करण्याकडे कल वाढीला लागला असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालकमंत्र्यांनी मत्स्य शेतीला चालना देण्याबाबत सूचना केल्या. मुलचेरा तालुक्यात नव्याने लागण केलेल्या १५०० स्ट्रॉबेरीच्या उत्पादनाविषयी माहिती जाणून घेतली. जर जिल्ह्यात उत्पादन चांगल्या प्रकारे येत आहे, तर निश्चितच त्याची लागवड मोठ्या प्रमाणात होऊ शकते. माझ्या जिल्ह्यातून यासाठी रोपे व इतर तांत्रिक मार्गदर्शन मिळण्यासाठी शेतकरी जोडून देता येतील, तसेच जिल्ह्यात उत्पादन वाढल्यास निश्चितच प्रक्रिया उद्योगही उभारता येईल. जांभूळ व त्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांना विक्रीसाठी नागपूर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी शेती विभागाच्या आखलेल्या नियोजनाची त्यांनी प्रशंसा केली. या बैठकीवेळी कृषी विभागामार्फत मानव विकास निधीमधून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या ट्रॅक्टरचे वाटप पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.