शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

मोहफूल संकलनासाठी एक लाखाचे बिज भांडवल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 12:59 IST

मोहफूल संकलन करणाऱ्या वनव्यवस्थापन समित्यांना बिज भांडवल म्हणून प्रती समिती एक लाख रूपयांचे अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे.

ठळक मुद्देपाच जिल्ह्यांना लाभचंद्रपूर व गोंदियात शीतगृह

दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मोहफूल संकलन करणाऱ्या वनव्यवस्थापन समित्यांना बिज भांडवल म्हणून प्रती समिती एक लाख रूपयांचे अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. गडचिरोलीसह पाच जिल्ह्यातील ६२ वन व्यवस्थापन समित्यांना याचा लाभ दिला जाणार आहे.विदर्भातील जंगलात मोहफुलाची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. मोहफूल हे औषधी गुणधर्म असलेले फूल आहे. मोहफुलापासून खाण्याचे विविध पदार्थ बनविले जात आहेत. सदर पदार्थ चविष्ट असल्याने दिवसेंदिवस या पदार्थांची मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे मोहफुलाचीही मागणी वाढून मोहफुलाला चांगली किंमत मिळत आहे. तसेच ग्रामीण जनतेला रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे. त्यामुळे मोहफूल संकलन, साठवणूक, मुल्यवर्धन व विपणन याकडे वन विभागाने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.मोहफूल संकलनाला वाव मिळावा, यासाठी मोहफुलांचे संकलन करणाºया संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांना प्रत्येकी एक लाख रूपयांचे बिज भांडवल उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा वन विभागातील १०, चंद्रपूर वन विभागातील ५, धुळे वनवृत्तातील मेवासा वन विभागातील २०, अमरावती वन विभागातील २६ व गोंदिया वन विभागातील एका वन व्यवस्थापन समितीला बिज भांडवल उपलब्ध करून दिले जाणार आहे. याच वन व्यवस्थापन समित्यांना प्रत्येकी २०० नग याप्रमाणे ग्रीन नेट जाळी उपलब्ध करून दिली जाणार. चंद्रपूर व गोंदिया येथे प्रत्येकी २५ लाख रूपये खर्चून शीतगृह बांधून दिले जाणार आहे. यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.आदिवासींना मिळणार प्रशिक्षणमोहफुलांपासून विविध चविष्ट पदार्थ बनविणे शक्य आहे. हे पदार्थ तयार केल्यास दुर्गम भागातील आदिवासी जनतेला रोजगारीचे साधन उपलब्ध होईल. तसेच मोहफुलाचे मूल्यवर्धन होऊन अधिकची किंमत मिळेल. या उद्देशाने वन विभाग आदिवासी नागरिकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणार आहे. गोंदिया येथे ५२ लाख रूपये खर्चून वनवृत्तस्तरावर प्रक्रिया केंद्र उभारले जाणार आहे.

टॅग्स :agricultureशेती