शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

बुर्गीत प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू

By admin | Updated: May 2, 2017 01:14 IST

महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून तालुक्यातील बुर्गी येथे नव्यानेच प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले आहे. याचा लाभ परिसरातील जनतेला होणार आहे.

उपकेंद्राचे रूपांतर : पदे भरून सुविधा पुरविण्याची मागणीएटापल्ली : महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून तालुक्यातील बुर्गी येथे नव्यानेच प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले आहे. याचा लाभ परिसरातील जनतेला होणार आहे.बुर्गी हे गाव एटापल्लीपासून बऱ्याच दूर अंतरावर आहे. वाहतुकीची साधने अत्यंत मर्यादित असल्याने रुग्णाला एटापल्ली येथील ग्रामीण रुग्णालयात पोहोचविताना अडचण निर्माण होत होती. त्यामुळे बुर्गी येथील प्राथमिक आरोग्य पथकाचे प्राथमिक आरोग्य केंद्रात रूपांतर करावे, अशी मागणी मागील १० वर्षांपासून केली जात होती. दोन वर्षांपूर्वी बुर्गीचे उपसरपंच रामा तलांडे यांनी मुख्यमंत्री बुर्गी आले असता त्यांना निवेदन दिले. यासर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पी. ई. राऊत, गेदाचे आरोग्य अधिकारी बी. एम. नरोटे, मानसेवी वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव छनीया, बुर्गीच्या सरपंच मिडकोबाई कोरसामी, उपसरपंच रामा तलांडे उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीतच ओपीडी सुरू करण्यात आली आहे. आरोग्य केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. वैभव छनीया हे काम पाहणार आहेत. ग्रामीण भागातून येणाऱ्या मलेरिया, टायफाईड, सर्पदंश, गरोदर माता यांच्यासाठी सदर प्राथमिक आरोग्य केंद्र सोयीचे झाले आहे. (तालुका प्रतिनिधी) १२ हजार लोकांना लाभबुर्गी प्राथमिक आरोग्य केंद्रात करपनफुंडी, कांदोळी, येमली, बिडरी, गटेपल्ली, उडेरा येथील उपकेंद्रांचा समावेश राहणार आहे. या परिसरात १२ हजार पेक्षा अधिक जनता असून या जनतेला आरोग्य केंद्राचा लाभ मिळणार आहे. नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रात गट अ चे दोन वैद्यकीय अधिकारी, रुग्णवाहिका चालक, आरोग्य सहायक (महिला/पुरूष), औषध निर्माता, लिपीक, चार एएनएम, शिपाई, स्विपर आदींची पदे मंजूर आहेत. यातील काही पदे रिक्त आहेत. सदर पदे भरून आरोग्य सुविधा पुरवाव्या, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.