शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्याचे काम निकृष्ट

By admin | Updated: May 2, 2017 01:11 IST

तालुक्यातील पलखेडा शेतशिवारात बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात येत आहे.

पालखेडा येथे बांधकाम : शेतकरी व भाजप पदाधिकाऱ्यांची तक्रारधानोरा : तालुक्यातील पलखेडा शेतशिवारात बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात येत आहे. सदर बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने या बांधकामाची चौकशी करून नव्याने बांधकाम करण्याचे निर्देश कंत्राटदाराला द्यावे, अशी मागणी होत आहे. पलखेडा येथील धान उत्पादक शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी सिमेंट काँक्रिट बंधाऱ्याचे बांधकाम केले जात आहे. सदर बांधकाम मागील महिनाभरापासून सुरू आहे. बंधाऱ्यावर थ्रेशर मशीनने फोडलेली काळी गिट्टी वापरने आवश्यक असतानाही या ठिकाणी स्थानिक मजुरांकडून फोडलेली बोल्ड गिट्टी वापरली जात आहे. बंधाऱ्यासाठी अत्यंत कमी प्रमाणात सिमेंट वापर केला जात असल्याचे बंधाऱ्याच्या बांधकामावरून दिसून येते. सदर बंधाऱ्याची अवस्था बघितली तर हा बंधारा पहिल्याच पावसाच्या पाण्यात वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. बंधारा वाहून गेल्यास यावर झालेला लाखो रूपयांचा शासनाचा खर्च वाया जाण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बांधकामाची चौकशी करावी, अशी मागणी प्रल्हाद उईके, नीलेश गेडाम, विजय शेडमाके, अनुसया फटिंग, गीता शेडमाके, माधव कटी, मनोहर फटिंग, प्रकाश नरोटे, लोगेश हेडो यांनी केली आहे. गावकऱ्यांच्या तक्रारीनंतर सदर कामाला भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष गोपाल उईके, माजी महामंत्री कैलास गुंडावार यांनी प्रत्यक्ष भेट दिली असता, काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे दिसून आले. या बंधाऱ्याच्या बांधकामाकरिता वृक्षतोडसुद्धा करण्यात आली आहे. निकृष्ट बंधाऱ्याबाबत संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क होऊ शकला नाही. (तालुका प्रतिनिधी)कोट्यवधींचा खर्च पाण्यातधानोरा तालुक्यात आजपर्यंत अनेक बंधारे बांधण्यात आले आहेत. या बंधाऱ्यांवर कोट्यवधी रूपयांचा खर्च झाला आहे. मात्र सदर बंधारे अगदी दोन ते तीन वर्षातच वाहून गेल्याने या बंधाऱ्यांचा लाभ शेतकऱ्यांना झाला नाही. यावर झालेला खर्च पाण्यात गेला आहे. बंधारा बांधकामासाठी लाखो रूपये मंजूर केले जातात. मात्र मंजूर निधीच्या ५० टक्केही निधी बंधाऱ्यावर खर्च केला जात नाही. त्यामुळे बंधाऱ्याची चौकशीची मागणी आहे.