शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

रेगडी आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:56 IST

परिसरातील रेगडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण झाली आहे. ऊन, पावसापासून बचावासाठी या इमारतीवर चक्क ताडपत्री टाकण्यात आली आहे. नवीन इमारतीअभावी जीर्ण इमारतीमध्ये जीव धोक्यात घालून रुग्णांना आरोग्य सेवा घ्यावी लागत आहे.

ठळक मुद्देछतावर झाकली ताडपत्री : २५ हजार लोकसंख्येसाठी केवळ तीनच प्राथमिक आरोग्य केंद

लोकमत न्यूज नेटवर्कघोट : परिसरातील रेगडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण झाली आहे. ऊन, पावसापासून बचावासाठी या इमारतीवर चक्क ताडपत्री टाकण्यात आली आहे. नवीन इमारतीअभावी जीर्ण इमारतीमध्ये जीव धोक्यात घालून रुग्णांना आरोग्य सेवा घ्यावी लागत आहे.घोट परिसरात चार पंचायत समिती क्षेत्र येतात. या परिसरात एकूण १९ गावे असून या गावांची लोकसंख्या २५ हजारांच्या जवळपास आहे. मात्र या परिसरात घोट, अडपल्ली व रेगडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या परिसरात अपघात झाल्यास २० किमी अंतरावर असलेल्या चामोर्शी येथील ग्रामीण रूग्णालयात रूग्णाला भरती करावे लागते. या प्रवासादरम्यान रूग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. घोट हे या परिसरातील सर्वात मोठे गाव आहे. त्यामुळे या ठिकाणी ग्रामीण रूग्णालय निर्माण करावे, अशी मागणी मागील २० वर्षांपासून केली जात आहे. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नवजात शिशु व महिलांसाठी तज्ञ डॉक्टर नाही. घोट येथे १० बेडची सुविधा असलेली इमारत आहे. परंतु सदर इमारत पावसाळ्यात गळते. त्यामुळे रूग्ण व कर्मचाºयांची हेळसांड होते. पावसाळ्यात पावसाचे पाणी जमा होते. त्यामुळे घोट व रेगडी येथील इमारतींची दुरूस्ती करावी, घोट येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करावे, अशी मागणी सिमुलतला ग्रामपंचायतीचे सरपंच सजल बिश्वास, शामल मंडल, पंचायत समितीच्या उपसभापती आकुली बिश्वास, साईनाथ नेवारे, सुगाबाई आत्राम, विलास उईके, उर्मिला पोगुलवार, शालिनी ठाकूर यांनी केली आहे. याबाबत जि.प. सदस्य नामदेव सोनटक्के यांना विचारणा केली असता, शासनाकडे पाठपुरावा केला असल्याची माहिती दिली. या समस्यांबाबत जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहार केला आहे. विकासपल्ली व वेंगनूर येथे उपकेंद्र प्रस्तावित असल्याची माहिती डॉ.उमाकांत मेश्राम यांनी दिली.घोट येथे ग्रामीण रूगणालयाची मागणीघोट परिसरात एकूण १९ गावे आहेत. या गावांची लोकसंख्या २५ हजारांच्या जवळपास आहे. मात्र या परिसरात ग्रामीण रूग्णालय नाही. त्यामुळे गंभीर स्थितीतील रूग्णाला चामोर्शी किंवा मुलचेरा येथील ग्रामीण रूग्णालयात हलविल्याशिवाय पर्याय राहत नाही. चामोर्शी तालुक्यातील टोकावर असलेल्या काही गावांचे अंतर चामोर्शीपासून ४० ते ५० किमी आहे. एवढे अंतर पार करून रूग्णालयात रूग्णाला दाखल करेपर्यंत रूग्ण दगावण्याची शकयता राहते. घोट हे मध्यवर्ती गाव असल्याने या ठिकाणी ग्रामीण रूग्णालय स्थापन करावे, अशी मागणी होत आहे.