शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएल सेवा कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:38 IST

सिरोंचा येथील शासकीय कार्यालये व बँकांमध्ये ब्रॉडबँडसेवा उपलब्ध आहे. परंतु बीएसएनएल सेवा योग्यप्रकारे मिळत नसल्याने कामे प्रभावी होत ...

सिरोंचा येथील शासकीय कार्यालये व बँकांमध्ये ब्रॉडबँडसेवा उपलब्ध आहे. परंतु बीएसएनएल सेवा योग्यप्रकारे मिळत नसल्याने कामे प्रभावी होत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात बीएसएनएलचे जाळे पसरले आहे. त्यामुळे या सेवेवरच ग्राहकांना अवलंबून राहावे लागत आहे. परंतु कव्हरेज वारंवार विस्कळीत होत असल्याने अनेक कामे प्रभावित होतात. ब्रॉडबँड सेवा विस्कळीत झाल्यानंतर ग्राहकांना बँकेसमोर तसेच शासकीय कार्यालयांमध्ये उभे राहावे लागते. इंटरनेटसेवा सुरळीत न झाल्यास दुपारनंतर त्यांना आल्यापावली परतावे लागते.

बीएसएनएलची थ्री-जी सेवा मागील एक वर्षापासून ग्राहकांना मिळत आहे. त्यातही खासगी कंपन्या फोर-जी सेवा देत असताना बीएसएनएल ग्राहकांना थ्री-जी वरच समाधान मानावे लागत आहे. बीएसएनएल थ्री-जी सेवा नावापुरतीच असून टू-जी ची स्पीडसुद्धा पकडत नाही.

बाॅक्स ......

शासकीय ऑनलाइन कामे प्रभावित

सिरोंचा तालुक्यात बीएसएनएलचे १० हजारांवर ग्राहक आहेत. रिचार्जच्या माध्यमातून कंपनीला बऱ्याप्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळते. महिन्याला लाखो रूपयांचे उत्पन्न देणाऱ्या ग्राहकांना योग्य प्रकारे सेवा मिळत नाही. तालुक्यात भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत होणे ही नित्याचीच बाब झाली आहे. याचा परिणाम कार्यालयीन कामे तसेच ऑनलाइन कामांवर होतो. शालेय विद्यार्थ्यांना विविध कामांकरिता प्रमाणपत्र ऑनलाइन काढावी लागतात. याशिवाय शासकीय कर्मचारीसुद्धा ऑनलाइन कामे करतात. परंतु त्यांना थ्री-जी सेवा योग्प्रकारे मिळत नसल्याने काम रखडते.