लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भारत संचार निगम लिमिटेडच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी आंदोलनाचे पडसाद बुधवारी गडचिरोलीत उमटले. येथील बीएसएनएलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बुधवारी कॉम्प्लेक्स परिसरातील बीएसएनएलच्या कार्यालयासमोर निदर्शने केली.दोन वर्ष उलटूनही बीएसएनएलचा तिसरा वेतन करार लागू झाला नाही. सदर वेतन करार लागू करण्यात यावा, इतर दूरसंचार कंपन्याप्रमाणे बीएसएनएलला ४-जी स्पेक्ट्रम देण्यात यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेतनआयोगाचा लाभ द्यावा, दुसऱ्या वेतन आयोगातील त्रुटी दुरूस्त करण्यात याव्या आदी मागण्यांसाठी बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांनी निदर्शन केली. सदर मागण्या निकाली न निघाल्यास बीएसएनएलचे अधिकारी व कर्मचारी ३ डिसेंबरपासून देशव्यापी संपावर जाणार आहेत.याबाबतची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व प्रमोद रामटेके, किशोर कापगते, केशव वऱ्हाडे, यशवंत गोन्नाडे यांनी केले. यावेळी कर्मचाऱ्यांनी शासनधोरणाविरोधात घोषणाबाजी केली.
बीएसएनएल कर्मचाऱ्यांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 01:18 IST
भारत संचार निगम लिमिटेडच्या अधिकारी व कर्मचाºयांच्या देशव्यापी आंदोलनाचे पडसाद बुधवारी गडचिरोलीत उमटले. येथील बीएसएनएलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बुधवारी कॉम्प्लेक्स परिसरातील बीएसएनएलच्या कार्यालयासमोर निदर्शने केली.
बीएसएनएल कर्मचाऱ्यांची निदर्शने
ठळक मुद्देशासनधोरणावर नाराजी : ३ डिसेंबरपासून देशव्यापी संप