शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

सरकारविरोधी पक्षाचा खासदार देण्याची परंपरा खंडीत

By admin | Updated: May 17, 2014 23:39 IST

गडचिरोली-चिमूर हा नवा मतदार संघ उदयाला आला असला तरी यापूर्वी गडचिरोली जिल्हा लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात दोन मतदार संघांमध्ये सहभागी होता.

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर हा नवा मतदार संघ उदयाला आला असला तरी यापूर्वी गडचिरोली जिल्हा लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात दोन मतदार संघांमध्ये सहभागी होता. या जिल्ह्याने कायम विरोधी बाजूला मोठा कौल देण्याचे काम केले आहे. मात्र २००९ नंतरच्या निवडणुकीत ही परंपरा बदलली. २००९ मध्ये काँग्रेसचे सरकार व काँग्रेसचा खासदार गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघाने पाठविला व २०१४ च्या सोळाव्या लोकसभेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले व गडचिरोली-चिमूरमधूनही भाजपचाच उमेदवार निवडून आला. त्यामुळे परिवर्तनाची परंपरा मतदारांनी मात्र कायम ठेवली आहे. १९९१ च्या निवडणूकीत मतदार संघाने काँग्रेसचे शांताराम पोटदुखे यांच्या बाजुने कौल दिला. या मतदार संघाचा या लोकसभा निवडणूकीत गडचिरोली जिल्ह्याचा विचार करता चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात समाविष्ट असलेल्या गडचिरोली-सिरोंचा या मतदार संघाने मात्र आपला कल नेहमी बदलवित ठेवला. ९१ च्या निवडणूकीत काँग्रेसचे शांताराम पोटदुखे यांचा सामना भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत झाला. या निवडणूकीत अहेरीचे राजे विश्वेश्वरराव महाराजही रिंगणात होते. पोटदुखे यांना गडचिरोली विधानसभा क्षेत्रात २५९९५, सिरोंचा विधानसभा क्षेत्रात १७९७९, राजे विश्वेश्वरराव महाराज यांना गडचिरोली क्षेत्रात २७४५ तर अहेरी क्षेत्रात १५८९१, भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांना गडचिरोली क्षेत्रात २६२७५, अहेरी क्षेत्रात ७८५८ मते मिळाली. याच निवडणूकीत चंद्रपूर लोकसभा मतदार संघातूनही भाजप विजयी झाला. हंसराज अहिर निवडून आलेत. यावेळी गडचिरोली विधानसभा क्षेत्रात त्यांना ४८२४०, सिरोंचा विधानसभा क्षेत्रात १७६०६ या निवडणूकीत नाग विदर्भ आंदोलन समितीचे राजे विश्वेश्वरराव महाराज पुन्हा रिंगणात होते. त्यांना गडचिरोली क्षेत्रात ६५६८, सिरोंचा क्षेत्रात ३९१७९ मते मिळाली. या निवडणूकीत काँग्रेसचे शांताराम पोटदुखे यांना गडचिरोली क्षेत्रात २४२९० तर सिरोंचा क्षेत्रात २६३४९ मते मिळाली. या निवडणूकीत अपक्ष म्हणून नरेश पुगलियाही रिंगणात होते. त्यांना गडचिरोली क्षेत्रात ९९६७ तर सिरोंचा क्षेत्रात ५२६८ मते मिळाली. काँग्रेसच्या मत विभाजनामुळे भाजपचा मार्ग मोकळा झाला होता. या निवडणूकीत चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून काँग्रेसच्या तिकीटावर नरेश पुगलिया निवडून आलेत. त्यावेळी पुगलिया यांना गडचिरोली क्षेत्रात ५९४३१, सिरोंचा क्षेत्रात ६६९०२, भाजपचे हंसराज अहिर यांना गडचिरोली क्षेत्रात ५५८११ व सिरोंचा क्षेत्रात ३३९४० मते मिळाली. १९९९ च्या निवडणूकीत चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून काँग्रेस पुन्हा विजयी झाली. नरेश पुगलिया यांना पुन्हा संधी मिळाली. मात्र गडचिरोली विधानसभा क्षेत्रात भाजपने आघाडी घेतली. २००४ च्या चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून हंसराज अहिर भाजपच्या तिकीटावर निवडून आले. त्यांना गडचिरोली क्षेत्रातून ६२०९९, पुगलिया यांना ४११७७, बसपाचे राजेंद्र वैद्य यांना १८४७७, सिरोंचा मतदार संघात अहिर यांना ५६७१३, पुगलिया यांना ३७७६८, वैद्य यांना १७१९९ मते मिळाली. एकुणच जुन्या चिमूर व चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचा कौल पाहता भाजप व काँग्रेस यांना आलटूनपालटून आघाडी मिळत राहिली.