शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2017 01:29 IST

मूलवरून चामोर्शीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने भेंडाळानजीकच्या घारगाव वळणावर दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे जण गंभीर

दोन गंभीर : भेंडाळानजीकच्या घारगाव वळणावरील घटना चामोर्शी : मूलवरून चामोर्शीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने भेंडाळानजीकच्या घारगाव वळणावर दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास चामोर्शी-मूल मार्गावर घडली. पंचायत समिती चामोर्शी कार्यालयात लिपीक पदावर कार्यरत असलेल्या संध्या गुरनुले व त्यांचा भाऊ संजय वानखेडे रा. घुग्गुस जिल्हा चंद्रपूर असे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. एमएच ३४ एई ७३२३ क्रमांकाच्या दुचाकीने संध्या गुरनुले व त्यांचा भाऊ संजय वानखेडे हे चामोर्शीकडे येत होते. तर चामोर्शीवरून एमएच ४३ ई ७११६ क्रमांकाचा कमल ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक धानाचे पोते घेऊन मूलकडे जात होता. दरम्यान ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भेंडाळा नजीकच्या घारगाव वळणावर दुचाकीला जबर धडक दिली. यात संध्या गुरनुले व संजय वानखेडे दोघेही गंभीर जखमी झाले. चामोर्शीचे पं.स. सदस्य प्रमोद भगत यांनी स्वत:च्या रूग्णवाहिकेतून दोन्ही जखमींना चामोर्शीच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी या दोन्ही जखमींना चंद्रपूरला हलविण्यात आले असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती कळताच चामोर्शीचे पोलीस निरिक्षक किरण अवचर हे स्वत: घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी येथील परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. या अपघातातील ट्रकचालक पळून जाऊ नये, यासाठी घटनास्थळावर जमालेल्या नागरिकांनी ट्रकच्या एका टायरची हवा सोडली. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरिक्षक किरण अवचार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. मूल ते चामोर्शी मार्गावर भेंडाळा परिसरात गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रात्रीच्या सुमारासही या मार्गावर यापूर्वी अनेकदा अपघात घडले. चालकावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. (प्रतिनिधी)