शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रापेक्षा बांधावरचे खत महाग

By admin | Updated: August 5, 2014 23:26 IST

महाराष्ट्र शासनाने मोठा गाजावाजा करीत बांधावर खत योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविली. त्यानंतर सदर योजना शासनाने बंद केली. सध्य:स्थितीत बांधावर खत योजना जिल्हा परिषदेमार्फत राबविली जात आहे.

अरूण राजगिरे ल्ल कोरेगाव/चोपमहाराष्ट्र शासनाने मोठा गाजावाजा करीत बांधावर खत योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविली. त्यानंतर सदर योजना शासनाने बंद केली. सध्य:स्थितीत बांधावर खत योजना जिल्हा परिषदेमार्फत राबविली जात आहे. परंतु सदर योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बांधावर खताचा पुरवठा करतांना कृषी केंद्रावर मिळणाऱ्या खताच्या किंमतीपेक्षा जास्त रक्कम वसूल केली जात आहे. या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे बांधावर खत योजना ही शेतकऱ्यांच्या फायद्याची की, नुकसानीची असा संतप्त सवाल शेतकरी करीत आहेत. खत निर्मात्यांकडून ज्या खताच्या बॅगवर एमआरपी छापली आहे. त्यापेक्षा कमी दराने कृषी केंद्रात खत मिळत असून दी विदर्भ को-आपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशन नागपूर यांनी पाठविलेल्या खताच्या किंमतीत प्रत्येक खताच्या बॅगवर ४० ते ५० रूपयांचा फरक आहे. त्यामुळे शासनाच्या ‘बांधावर खत’ योजनेत काळाबाजार नाही का, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत बांधावर खत योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत बांधावर बियाणे व खत पुरविण्यासाठी वाहतूक खर्चाचेसुद्धा नियोजन होते. यासाठी जि. प. गडचिरोली यांच्याकडे ३ लाख ५ हजार रूपयाची तरतूद करण्यात आली होती. परंतु रॅक पार्इंट असलेल्या देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. दी विदर्भ को-आपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशन यांनी ग्रेड व कंपनीनिहाय खताच्या किंमतीचे दर पत्रकानुसार जे या योजनेंतर्गत बांधावर खत योजना आहे. त्यामध्ये प्रत्येक कंपनीच्या प्रती बॅगवर ४० ते ५० रूपये जादा दर आकारण्यात आले. केवळ युरिया वगळता इतर खत जादा किंमतीने विक्री केले जात आहे. त्यामुळे बांधावरील खत योजनेद्वारे मिळणारे खत कृषी केंद्रावरील खतापेक्षा महाग असल्याचे दिसून येत आहे.