शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दोघांना मिळाला एकच आधार क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 06:00 IST

दागो राजगडे यांनी आधार कार्ड काढण्याची मोहीम सुरू झाली, तेव्हाच आधार कार्ड काढला. सर्वच ठिकाणी राजगडे यांनी आधार कार्ड दिला. गोरगरीबांच्या योजनांचा त्यांना लाभ मिळत होता. किन्हाळा ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया हंसराज नानाजी लोखंडे यांनी आधार कार्ड काढला. लोखंडे यांना राजगडे यांचा आधार क्रमांक देण्यात आला.

ठळक मुद्देअपवादात्मक घटना : दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात जमा होताहेत पैसे

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : देसाईगंज तालुक्यातील किन्हाळा येथील दागो भिका राजगडे व मोहटोला येथील हंसराज नानाजी लोखंडे यांना एकाच क्रमांकाचा आधार कार्ड मिळाला आहे. विशेष म्हणजे, दागो राजगडे यांच्या नावाच्या योजनांचे पैसे लोखंडे यांच्या खात्यात जमा होत असल्याने राजगडे यांची अडचण वाढली आहे.दागो राजगडे यांनी आधार कार्ड काढण्याची मोहीम सुरू झाली, तेव्हाच आधार कार्ड काढला. सर्वच ठिकाणी राजगडे यांनी आधार कार्ड दिला. गोरगरीबांच्या योजनांचा त्यांना लाभ मिळत होता. किन्हाळा ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया हंसराज नानाजी लोखंडे यांनी आधार कार्ड काढला. लोखंडे यांना राजगडे यांचा आधार क्रमांक देण्यात आला. त्यामुळे लोखंडे व राजगडे या दोघांचेही आधार क्रमांक सारखे झाले. त्यानंतर रोजगार हमी योजना, गॅस सबसिडी, बँक खात्यात जमा होणारे इतर योजनांचे पैसे लोखंडे यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरूवात केली. राजगडे यांना शंका आल्याने त्यांनी याबाबत विचारणा केली असता, लोखंडे व आपला आधार क्रमांक ७८५८६११९१२०८ हा सारखाच असल्याचे लक्षात आले. तसेच दागो यांच्या आधार कार्डावर हंसराज लोखंडे यांचा फोटो अपलोड झाला. प्रत्येक योजनेसाठी आधार कार्ड आवश्यक आहे. अशा स्थितीत राजगडे यांचा आधार कार्ड दोषपूर्ण असल्याने त्यांना अनेक योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आधार कार्डासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमला आहे. त्यांनी योग्य ते मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.कार्यालयांच्या चकरा मारून थकले राजगडेआधार कार्ड हा त्या व्यक्तीची ओळख दर्शविणारा प्रमाणपत्र आहे. मात्र एकाच क्रमांकाचा आधार कार्ड दोन व्यक्तींना मिळण्याची ही देशातील अपवादात्मक घटना असावी. आपल्याला नवीन आधार क्रमांक देण्यात यावा, या मागणीसाठी राजगडे यांनी अनेक आधार केंद्र तसेच कार्यालयांमध्ये विचारणा केली. मात्र अजूनपर्यंत त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले नाही. त्यामुळे आधारची अडचण कायम आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड