शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

धानाचे बोनस केवळ आश्वासनच!

By admin | Updated: August 5, 2014 23:27 IST

आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या धानाला शासनाने प्रति क्विंटल २०० रूपये बोनस जाहीर केले होते. मात्र चार महिन्याचा कालावधी लोटूनही बोनस मिळाले नाही.

गडचिरोली : आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या धानाला शासनाने प्रति क्विंटल २०० रूपये बोनस जाहीर केले होते. मात्र चार महिन्याचा कालावधी लोटूनही बोनस मिळाले नाही. त्यामुळे सदर बोनसची रक्कम केवळ आश्वासनच ठरते की काय, असा प्रश्न शेतकरी वर्गाकडून उपस्थित केला जात आहे. धानाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी भाव दिल्या जातो. परिणामी शेतकऱ्यांना दरवर्षीच तोट्याचा सामना करावा लागतो. मागील वर्षी मुसळधार पावसामुळे धानाचे पीक वाहून गेले. काही शेतकऱ्यांना दोन वेळा धानाची रोवणी करावी लागली होती. दोनदा रोवणीचा खर्च उचलल्यानंतरही रोवणी उशीरा झाल्याने अपेक्षित उत्पादन झाले नाही. उत्पादन खर्च जास्त व उत्पादन कमी अशा गर्तेत शेतकरी सापडला असतानाच धान बाजारपेठेत विकण्यासाठी नेल्यानंतर त्या ठिकाणीसुध्दा इतर मालाच्या तुलनेत धानाला अत्यंत कमी भाव मिळत होता. त्यामुळे बाजारपेठेतही गेल्यानंतर शेतकऱ्याच्या पदरी निराशाच पडली होती. त्यामुळे धानाला जादा भाव देण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात आली होती. या मागणीचा विचार करीत शासनाने आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या धानाला शासनाने प्रती क्विंटल २०० रूपये बोनस जाहीर केला आहे. जिल्ह्यातील शेतकरी आदिवासी विकास महामंडळाच्या मार्फतीने चालविण्यात येणाऱ्या आदिवासी विविध कार्यकारी संस्थेत धान्य विकतात. या संस्थेकडे धान्य विकणाऱ्या शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळणे आवश्यक होते. मात्र चार महिन्याचा कालावधी लोटूनही बोनसची रक्कम मिळाली नाही. सदर रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार होती. मात्र असे काहीच झाले नाही. आदिवासी विविध कार्यकारी संस्थांकडे हजारो शेतकरी कोट्यवधी रूपयाचे धान्य विकले आहे. बोनसची रक्कम मिळाली असती तर या रकमेतून चालू हंगामाचा खर्च भागविणे शक्य झाले असते. चार महिने लोटूनही बोनसची रक्कम मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये सदर रक्कम मिळणार की नाही अशी शंका निर्माण झाली आहे. शासनाने दिलेल्या आश्वासन पाळून आचारसंहिता लागण्यापूर्वी सदर रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी अशी मागणी भाजपचे शहर पदाधिकारी जीवन मेश्राम यांनी अधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे. (नगर प्रतिनिधी)