शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
4
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
5
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
6
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
7
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
8
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
9
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
10
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
11
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
12
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
13
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
14
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
15
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
16
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
17
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
18
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
19
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...

बोगस संस्थांनी उचललेली रक्कम थक्क करणारी

By admin | Updated: January 11, 2015 22:51 IST

एकीकडे महाविद्यालयांना विद्यार्थी मिळत नसल्याने त्यांच्या तुकड्या बंद पडत आहे. तर दुसरीकडे तांत्रिक शिक्षण देणाऱ्या या महाविद्यालयांकडे विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा प्रचंड महापूर आहे

गडचिरोली : एकीकडे महाविद्यालयांना विद्यार्थी मिळत नसल्याने त्यांच्या तुकड्या बंद पडत आहे. तर दुसरीकडे तांत्रिक शिक्षण देणाऱ्या या महाविद्यालयांकडे विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा प्रचंड महापूर आहे की, काय अशी स्थिती उचललेल्या शिष्यवृत्तीच्या रक्कमांवरून दिसून येत आहे. महाविद्यालयांची पाहणी करून तेथे एवढे विद्यार्थी आहेत काय याची शहानिशा न करता सरसकट शिष्यवृत्ती वितरणाचे काम आदिवासी विकास विभागाच्या अहेरी व भामरागड प्रकल्पाने केले, असे ‘लोकमत’ला मिळालेल्या या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.हिंदी राष्ट्रभाषा ज्ञानमंडळ वर्धाद्वारा संचालित महात्मा गांधी कॉलेज आलापल्लीने समाज कल्याण विभागाकडे १८० अनुसूचित जातीचे विद्यार्थी नोंदविले व १३९ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम उचल केली. तसेच आदिवासी विभागाकडे ११० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी नोंदणी करण्यात आली व ९७ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम उचलली. दोनही विभागाचे मिळून २३६ विद्यार्थ्यांचे प्रत्येकी ४० हजार प्रमाणे ९४ लाख ४० हजार रूपये एका महाविद्यालयाने उचलले आहे. असाच प्रकार अहेरीच्या विद्याभारती कॉलेज आॅफ अ‍ॅडव्हान्स स्टडीज या महाविद्यालयानेही केला आहे. गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न असलेले हे महाविद्यालय गुरूकूल शिक्षण संस्था वर्धाद्वारा संचालित चालविले जाते. या महाविद्यालयाने समाज कल्याण विभागाकडे अनुसूचित जातीचे १४८ विद्यार्थी नोंदविले व १३३ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम उचल केली. ४४ ओबीसी विद्यार्थ्यांची नोंदणी करून ३०, आठ एसबीसी विद्यार्थ्यांची नोंदणी करून पाच विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रक्कम उचलली. त्यासोबतच १८ व्हीजेएनटी विद्यार्थ्यांची नोंदणी समाज कल्याण विभागात करून १५ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम उचलली. समाज कल्याण विभागाकडून २१७ पैकी १८३ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे ३२ लाख ९४ हजार रूपये उचल केले आहे. प्रती विद्यार्थी १८ हजार रूपये प्रमाणे या रक्कमा घेण्यात आले आहे. आदिवासी विकास विभागाकडे या महाविद्यालयाने ५२ विद्यार्थ्यांची नोंदणी केली. मात्र तेथून शिष्यवृत्तीची रक्कम त्यांना मिळविता आली नाही. या संस्थेचे काम वर्धा येथील भाजपच्या एका आमदाराच्या मार्गदर्शनात वर्धाच्याच एक कार्यकर्ता करीत आहे, अशी माहिती ‘लोकमत’ला मिळाली आहे. एटापल्लीच्या सद्गुरू साई या राहुल बोम्मावार यांच्या महाविद्यालयाने समाज कल्याण विभागाकडे ४४ अनुसूचित जाती, १७५ ओबीसी, आठ एसबीसी व १६ व्हीजेएनटी अशा एकूण २४३ विद्यार्थ्यांची नोंदणी शिष्यवृत्तीसाठी केली व या सर्वांची शिष्यवृत्ती त्यांनी उचलली आहे. आदिवासी विकास विभागाकडे सन २०१३-१४ मध्ये १४१ विद्यार्थ्यांची नोंदणी करून १३९ विद्यार्थ्यांचे पैसे त्यांनी उचल केले. १ कोटी ५२ लाख ८० हजाराच्या घरात हा आकडा जातो. ही सर्व आकडेवारी पाहू जाता आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयातील अधिकाऱ्यांचे संपूर्ण आशिर्वाद या संस्थाचालकांना असल्याने त्यांनी शासनाला कोट्यवधी रूपयाचा चूना अहेरी व भामरागड एकात्मिक प्रकल्पातही लावलेला आहे. त्यामुळे या घोटाळ्याची चौकशी सुरू होणे आवश्यक आहे. (जिल्हा प्रतिनिधी)