शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.तील विकास प्रक्रिया खंडीत करण्याचा भाजपचा प्रयत्न

By admin | Updated: October 14, 2015 01:49 IST

जिल्हा परिषद ही मिनीमंत्रालय आहे. या मंत्रालयातून ग्रामीण भागाच्या विकासाचे काम चालते.

पत्रकार परिषद : नामदेव उसेंडी यांचा आरोपगडचिरोली : जिल्हा परिषद ही मिनीमंत्रालय आहे. या मंत्रालयातून ग्रामीण भागाच्या विकासाचे काम चालते. परंतु ही विकास प्रक्रिया खंडीत करून आपल्या पक्षाकडे जिल्हा परिषदेची सत्ता मिळविण्याच्या लालसेपोटी भारतीय जनता पक्षाने सभापती अतुल गण्यारपवार व अजय कंकडालवार यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल केला. हा प्रस्ताव पारित करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या साऱ्या नितीचा वापर भाजपकडून करण्यात आला. या परिस्थितीतही जनतेच्या आशिर्वादामुळे घटस्थापनेला भारतीय जनता पक्षाला प्रचंड हादरा यानिमित्ताने बसला, असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी केला. डॉ. नामदेव उसेंडी म्हणाले, गडचिरोली जिल्हा विकास निधी नैसर्गिक न्यायानुसार प्रत्येक वर्षाला १० टक्के वाढायला हवा. परंतु भारतीय जनता पक्षाच्या पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्या निष्क्रीयतेमुळे सहा कोटीने तो कमी झाला आहे. नियोजन समितीच्या बैठकीत नियोजनाऐवजी भलत्याच बाबींवर चर्चा करून या बैठकीला पक्षाच्या बैठकीचे स्वरूप आणण्यात आले आहे, असा आरोप डॉ. उसेंडी यांनी केला. दोन-दोन महिने जिल्हा परिषद सदस्यांना तिर्थयात्रेसाठी घेऊन जाऊन विकास प्रक्रिया ठप्प करण्याचे काम भाजपच्या नेतृत्वात झाले. ही लोकशाहीची थट्टा असल्याचे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेत सभापती अतुल गण्यारपवार यांनी जिल्हा परिषदेच्या अविश्वास प्रस्तावात मोठ्या प्रमाणावर अर्थकारण झाल्याचा थेट आरोप केला. अनेक सदस्यांना पैशाचे आमिष दाखवून आपल्या बाजुने वळते करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असेही ते म्हणाले. जिल्हा विकासाकडे भारतीय जनता पक्षाचे लक्ष नसल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेला माजी आमदार दीपक आत्राम, काँग्रेस नेते रवींद्र दरेकर, मनोहर पाटील पारेटी, अ‍ॅड. गजानन दुगा, सभापती देवेंद्र भांडेकर, प्रभाकरराव वासेकर, शंकरराव सालोटकर, काशिनाथ भडके, परमानंद मलिक उपस्थित होते.