शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला लागले ‘लोकसभा २०१९’चे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2017 02:20 IST

येत्या दोन वर्षानंतर (२०१९) येणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुथस्तरापर्यंत पक्षाला बळकटी

पक्ष बळकटीकरणावर भर : पं.दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी व कार्यविस्तारातून मतदारांना जोडणारलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : येत्या दोन वर्षानंतर (२०१९) येणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुथस्तरापर्यंत पक्षाला बळकटी देण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी पं.दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दीनिमित्त विविध कार्यक्रमातून आणि कार्य विस्तार योजनेतून मतदारांपर्यंत शासनाच्या योजना आणि झालेली विकास कामे पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती जिल्ह्याचे खासदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष अशोक नेते यांनी गुरूवारी दिली.बुधवारी गडचिरोलीत भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीची विस्तीर्ण बैठक झाली. त्यात कार्य विस्तार योजना समितीच्या प्रमुखपदी बाबुराव कोहळे व सहप्रमुख म्हणून रवी ओल्लालवार यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच पं.दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी समारोह समितीच्या प्रमुखपदी प्रकाश अर्जुनवार आणि सहप्रमुख म्हणून डॉ.भारत खटी यांची नियुक्ती केल्याची माहिती यावेळी खासदार नेते यांनी दिली. कार्य विस्तार योजनेअंतर्गत २९ मे ते १२ जून यादरम्यान जिल्ह्यातील ९०४ बुथवर प्रतिबुथ १० कार्यकर्ते आणि १ प्रमुख अशा ११ लोकांची निवड करून त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी ३ प्रकारचे विस्तारक नेमले जाणार आहेत. कार्य विस्तार योजनेअंतर्गत सर्व विस्तारक आणि प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी किमान १५ दिवस पक्षकार्यासाठी स्वत:ला वाहून घ्यायचे आहे. याशिवाय पं.दिनदयाल जन्मशताब्दी समारोहाअंतर्गत रक्तदान शिबिर, वृक्षारोपण अशा काही सामाजिक उपक्रमांसह पं.दिनदयाल यांचे स्टीकर्स व फोटो गावागावो जाऊन घरोघरी लावले जाणार आहेत.या पत्रपरिषदेला गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगिता पिपरे, उपनगराध्यक्ष अनिल कुनघटकर, भाजपचे शहर अध्यक्ष सुधाकर येनगंधलवार, डॉ.भारत खटी, प्रमोद पिंपरे, रमेश भुरसे, पं.स.उपसभापती विलास दशमुखे, भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष जावेद अली आदी प्रामुख्याने उपस्थित होते.