शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

भाजप व काँग्रेसलाही बंडखोरीचे ग्रहण

By admin | Updated: October 17, 2015 01:59 IST

कुरखेडा नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा व काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीकरिता मोठे घमासान सुरू झाले.

कुरखेडा : कुरखेडा नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा व काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीकरिता मोठे घमासान सुरू झाले. भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगर पंचायती तीन प्रभागात तर काँग्रेसकडून दोन प्रभागात दोन-दोन उमेदवारांनी आपली दावेदारी सादर करीत नामांकन दाखल केले आहे. त्यामुळे कुरखेडा नगर पंचायतीत भाजप व काँग्रेस पक्षात बंडखोरी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. १७ सदस्यीय कुरखेडा नगर पंचायत निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या चारही प्रमुख पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. शिवसेनेचे जिल्हा नेतृत्व हे स्थानिक असल्याने त्यांच्या निर्णयाला कोणतेच आव्हान नव्हते. त्यामुळे शिवसेनेत तिकीट वाटपात असंतोष निर्माण झाला नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारीचे मोजकेच दावेदार असल्याने पक्ष नेतृत्वाला तिकीट वाटपात काही अडचण आली नाही. राष्ट्रवादी व शिवसेना या दोन्ही पक्षात सध्या एकजुटीचे वातावरण आहे. मात्र भारतीय जनता पार्टी व काँग्रेस याला अपवाद आहे. भाजपातर्फे प्रभाग क्र. १ मध्ये गणपत सोनकुसरे व रामहरी उगले तर प्रभाग क्रमांक ७ मधून अ‍ॅड. उमेश वालदे व मुन्ना सहारे, प्रभाग क्रमांक ९ मध्ये मनीष शर्मा व वामदेव सोनकुसरे यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारीकरिता दावेदारी सादर केली. काँग्रेस पक्षातर्फे प्रभाग क्रमांक १३ मध्ये जयश्री धाबेकर व खान रजिया बानो तर प्रभाग क्र. १४ मध्ये विमल हलामी व शाहेदा मुगल यांनी दावेदारी सादर केली. दोन्ही पक्षाचे सर्व दावेदार उमेदवार पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते असल्याने पक्षश्रेष्ठीपुढे नगर पंचायत निवडणुकीत गंभीर पेच निर्माण झाला होता. अखेरच्या क्षणापर्यंत अनिर्णयाची परिस्थिती होती. १२ आॅक्टोबर ही पक्षाचा एबी फॉर्म सादर करण्याची अंतिम मुदत होती. अखेर निर्णय घेत दोन्ही पक्षाच्या पुढाऱ्यांनी पक्षाचा एबी फॉर्म उमेदवाराच्या हातात न देता थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केले. मात्र ज्यांचा दावा नाकारण्यात आला त्या उमेदवार व त्यांच्या समर्थकांना पक्षाच्या या निर्णयाची कुणकुण लागली असल्याने सध्या कुरखेडाच्या राजकीय वर्तुळात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. नामांकन अर्ज परत घेण्याची मुदत ही २३ आॅक्टोबरपर्यंत आहे. या कालावधीत असंतुष्टांची मनधरणी करण्याचा पक्ष नेत्यांकडून जोरदार प्रयत्न होत आहे. मनधरणी करण्याच्या कामात भाजप नेतृतव अधिक सक्रीय असल्याने काही प्रभागात बंडखोरी टाळण्यात भाजप नेत्यांना यश येण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेस पक्षाच्या या निर्णयामुळे दोन्ही प्रभागात प्रचंड असंतोष निर्माण झाला असून या प्रभागात काँग्रेसमध्ये बंडखोरी अटळ असल्याची जोरदार चर्चा शहरात आहे. (तालुका प्रतिनिधी)