शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बायोमेट्रिक प्रणाली दर्जा सुधारण्यास आवश्यक

By admin | Updated: January 13, 2015 22:58 IST

बायोमेट्रिक प्रणालीच्या व्यवस्थित वापरामुळे आश्रमशाळातील तसेच वसतिगृहातील विद्यार्थी व कर्मचारी नियमित राहून चांगली सेवा देत असल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम शासकीय

पी. शिवशंकर यांचा विश्वास : ११ आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये इमारतीचे काम मंजूरगडचिरोली : बायोमेट्रिक प्रणालीच्या व्यवस्थित वापरामुळे आश्रमशाळातील तसेच वसतिगृहातील विद्यार्थी व कर्मचारी नियमित राहून चांगली सेवा देत असल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढण्यास निश्चितपणे मदत होईल, असा विश्वास गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रभारी प्रकल्प अधिकारी पी. शिवशंकर यांनी व्यक्त केला आहे.राज्य शासनाच्या ११ नोव्हेंबर २०११ च्या शासन निर्णयानुसार गडचिरोली प्रकल्पातील सर्व शासकीय, अनुदानित व वसतिगृहामधील विद्यार्थ्यांसाठी तसेच कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे बोगस उपस्थिती दाखविणाऱ्यांवर आळा बसला आहे. तसेच शासनाच्या अतिरिक्त होणाऱ्या खर्चाचीही बचत झाली आहे. शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील प्रशासन पारदर्शक व शिस्तीत राहावे, या उद्देशाने गडचिरोली प्रकल्पातून बायोमेट्रिक प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीची फलश्रुती चांगली दिसून येत आहे.आदिवासी विद्यार्थी संघ तसेच आदिवासी विद्यार्थ्यांनी बायोमेट्रिक प्रणालीचा बाऊ करू नये, उलट संघाच्या पदाधिकारी व विद्यार्थ्यांनी त्यांचे हित लक्षात घेऊन प्रणालीवर नियमित हजेरी नोंदवून प्रकल्प कार्यालयास सहकार्य करावे, असे आवाहन शिवशंकर यांनी केले आहे. बायोमेट्रिक मशिनच्या व्यवस्थित वापरामुळे देसाईगंज वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या आहार व निर्वाह भत्त्याचे देयक पूर्णपणे काढण्यात आले आहे. मात्र गडचिरोली येथील वसतिगृहातील बायोमेट्रिक यंत्रणेच्या प्रिंट प्रकल्प कार्यालयास प्राप्त न झाल्याने त्यांचे बिल काढण्याची प्रक्रिया प्रकल्पस्तरावर सुरू आहे.गडचिरोली प्रकल्पांतर्गत सर्व वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा आॅक्टोबर महिन्यापर्यंतचा निर्वाहभत्ता देण्यात आला असून नोव्हेंबरपासून देयक काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रकल्पातील आश्रमशाळांना खेळ साहित्य देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)