शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

बायोमॅट्रीक प्रणाली ‘फेल’

By admin | Updated: July 31, 2014 00:00 IST

बोगस विद्यार्थी दाखवून वसतिगृहाच्या माध्यमातून शासनाकडून दरवर्षी लाखो रूपयाचे अनुदान लाटण्याचा प्रकार शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर शासनाने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातील

वर्षभरापासून : दुर्गम भागातील १५ वसतिगृहातील मशीन बंदगडचिरोली : बोगस विद्यार्थी दाखवून वसतिगृहाच्या माध्यमातून शासनाकडून दरवर्षी लाखो रूपयाचे अनुदान लाटण्याचा प्रकार शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर शासनाने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहांमध्ये बायोमॅट्रीक प्रणाली कार्यान्वित केली. मात्र जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या अधिनस्त असलेल्या खासगी संस्थांच्या तब्बल १५ वसतिगृहातील बायोमॅट्रीक मशीन वर्षभरापासून बंद असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. जि.प.च्या समाजकल्याण विभागाच्या अधिनस्त जिल्हाभरात खासगी संस्थांचे एकूण ५४ मुलामुलींचे वसतिगृह आहेत. दरवर्षी या वसतिगृहांना जि.प. समाजकल्याण विभागामार्फत प्रती विद्यार्थी ९०० रूपये याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या भोजनाचे अनुदान दिल्या जाते. या वसतिगृहाच्या कारभारात पारदर्शकपणा यावा यासाठी जिल्ह्यातील ५२ वसतिगृहांमध्ये सन २०१३ अखेर बायोमॅट्रीक प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. मात्र अवघ्या दोन महिन्यात १५ वसतिगृहातील बायोमॅट्रीक प्रणाली बंद असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अन्य वसतिगृहातही बायोमॅट्रीक प्रणालीचा उपयोग करण्यात येत नसल्याची माहिती आहे. यामुळे या वसतिगृहातील कारभारांवर जि.प. समाजकल्याण विभागाला अपेक्षित नियंत्रण ठेवता येत नाही. खासगी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या समाजकल्याणच्या वसतिगृहांमध्ये गडचिरोली तालुक्यात ७ वसतिगृह आहेत. धानोरा तालुक्यात तीन, कोरची तालुक्यात तीन, आरमोरी तालुक्यात १२, कुरखेडा तालुक्यात ९, चामोर्शी तालुक्यात ३, एटापल्ली तालुक्यात २, भामरागड येथे १, अहेरी तालुक्यात ८ व सिरोंचा तालुक्यात ६ वसतिगृह आहेत. या वसतिगृहांना विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार दरवर्षी जि.प.च्या समाजकल्याण विभागाकडून अनुदान दिल्या जाते. केवळ दोनच वसतिगृहांच्या इमारती खासगी संस्थांच्या मालकीच्या आहेत. उर्वरित सारेच वसतिगृह गेल्या २० ते २५ वर्षापासून भाड्याच्याच इमारतीत सुरू आहे. यापैकी १० वसतिगृह कवेलुच्या इमारतीत सुरू आहेत. पावसाळ्याच्या दिवसात या वसतिगृहांच्या छतातून पाणी गळते. या वसतिगृहांमध्ये अनेक सोयीसुविधांचा अभाव आहे. जि.प. समाजकल्याण विभागामार्फत या वसतिगृहांची वर्षातून तीनदा तपासणी केली जाते. वर्षभरापासून बायोमॅट्रीक मशीन बंद असणाऱ्या वसतिगृहांमध्ये एटापल्ली, भामरागड, सिरोंचा आदी तालुक्यातील तसेच कोरची तालुक्यातील दोन वसतिगृहांचा समावेश आहे. गडचिरोली तालुक्यातील गोगाव व गडचिरोली हे दोन वसतिगृह वगळून सारेच वसतिगृह भाड्याच्या इमारतीत असल्याने विद्यार्थ्यांसाठी या वसतिगृहांची इमारत अपुरी पडत आहे. जि.प. समाजकल्याण विभागाकडून वसतिगृह चालविणाऱ्या खासगी संस्थांना दरवर्षी एकूण भाड्याच्या रक्कमेचे ७५ टक्के अनुदान दिल्या जाते. या वसतिगृहांना दोन दशकापेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. मात्र अनेक खासगी संस्थांनी स्वत:च्या मालकीची इमारत उभारली नसल्याचे दिसून येते. (स्थानिक प्रतिनिधी)