शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

बायोगॅस योजनेला घरघर

By admin | Updated: April 12, 2015 02:14 IST

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत अनुसूचित जाती, जमाती तसेच अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना १०० टक्के सवलतीवर बायोगॅस प्रोत्साहनपर अनुदान योजना राबविण्यात येते.

गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत अनुसूचित जाती, जमाती तसेच अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना १०० टक्के सवलतीवर बायोगॅस प्रोत्साहनपर अनुदान योजना राबविण्यात येते. मात्र जिल्हा परिषदेच्या २०१५-१६ या वर्षाच्या अंदाजपत्रकात पंचायत समितीच्या सेस फंडात निधीची तरतूद करण्यात न आल्याने बायोगॅस प्रोत्साहन योजनेला अखेरची घरघर लागली असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकात बाराही पंचायत समित्यांसाठी सेस फंडाची तरतूद करण्यात येते. यामध्ये १२ ते १३ विभागांना विविध योजनेसाठी निधीची तरतूद केली जाते. धानोरा पंचायत समिती अंतर्गत अनुसूचित जाती, जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना १०० टक्के सवलतीवर प्रतिलाभार्थी चार हजार रूपयांप्रमाणे बायोगॅस प्रोत्साहनपर अनुदान देण्याबाबत नियोजन करण्यात आले होते. मात्र जि. प. च्या २०१५-१६ या वर्षाच्या अंदाजपत्रकात बायोगॅसकरिता एकाही पैशाची तरतूद करण्यात आली नाही. एटापल्ली पंचायत समितीला लाभार्थ्यांना बायोगॅस शेगडी पुरविणे तसेच लाभार्थ्यास अनुदान देण्यासाठी २०१५-१६ च्या अंदाजपत्रकात केवळ सात हजार रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. अहेरी पंचायत समितीसाठी बायोगॅस संयत्रावर अनुदान देण्यासाठी फक्त २० हजार रूपयांची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. बायोगॅस प्रोत्साहन योजनेसाठी जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकात भरघोस निधीची तरतूद करण्यात न आल्यामुळे जिल्ह्यात बायोगॅस योजनेला अखेरची घरघर लागण्याची शक्यता आहे. (स्थानिक प्रतिनिधी)