शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

मनामनातून गुंजला भोलेनाथाचा जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:06 IST

श्री मार्कंडेश्वराच्या मुख्य मंदिरातील गाभाऱ्यात असलेल्या शिवपिंडीची परंपरेनुसार ब्रह्म मुहूर्तावर पहाटे ४.३० ते ६ वाजेपर्यतमहापुजा करण्यात आली. या महापुजेचा ...

श्री मार्कंडेश्वराच्या मुख्य मंदिरातील गाभाऱ्यात असलेल्या शिवपिंडीची परंपरेनुसार ब्रह्म मुहूर्तावर पहाटे ४.३० ते ६ वाजेपर्यतमहापुजा करण्यात आली. या महापुजेचा मान जि.प. कृषी सभापती रमेश बारसागडे, त्यांच्या पत्नी कविता, व्यवसायिक प्रफुल्ल भांडेकर, पत्नी वैशाली, गुरव पुजारी पंकज महाराज पांडे, त्यांच्या पत्नी शुभांगी यांना मिळाला. नाना महाराज आमगावकर, रामू महाराज गायकवाड, श्रीकांत महाराज पांडे यांनी पौरोहित्य केले.

महापूजेच्या वेळी मंदिर परिसरात कोविड-१९ च्या नियमांचे पालन करत तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, चामोर्शी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नागनाथ पाटील, मार्कंडेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्युंजय गायकवाड, सहसचिव रामुजी तिवाडे, दिलीप चलाख, जयराम चलाख, यश गण्यारपवार, गोपाल मेनेवाल, उज्वल गायकवाड उपस्थित होते. यावेळी संपूर्ण मंदिर परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. मार्कंडादेव येथील हार, फुले, नारळ, मूर्ती, फोटो विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे भाविकांचा हिरमोड झाला.

वैरागड येथील भंडारेश्वराची जत्रा रद्द केली असली तरी भाविकांना कोरोनाचे नियम पाळत दर्शन घेऊ दिले जात होते. सायंकाळपर्यंत दर्शन घेण्यासाठी रांग कायम होती. यात्रा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी लोक एकत्र येऊ नये यासाठी सगळ्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या होत्या. भाविकांना प्रसादाचे वितरण, पाण्याची व्यवस्था भंडारेश्वर समितीकडून करण्यात आली.

चपराळा मंदिरात पहाटे चार वाजता अभिषेक

आष्टी : चपराळा येथील शिवमंदिरात देवस्थानच्या सहा कर्मचाऱ्यांनी पहाटे ४ वाजतापासून महादेवाचा अभिषेक व पुजेला सुरुवात केली. त्यांनतर आरती करून महादेवाला प्रसाद अर्पण केला. हे देवस्थान संत कार्तिकस्वामी महाराज यांच्या पावन स्पर्शाने नावारूपाला आले. घनदाट जंगलात असणाऱ्या या मंदिरात महाशिवरात्रीला विदर्भ, तेलंगणा, मध्यप्रदेश तसेच इतर जिल्ह्यातील भाविक येतात. यावर्षी मात्र पहिल्यांदाच महाशिवरात्री यात्रा भरली नाही. त्यामुळे असंख्य भाविकांना घरीच महादेवाची पूजा करावी लागली.