शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

भामरागड, चपराळा अभयारण्य वाऱ्यावर

By admin | Updated: September 6, 2014 01:55 IST

गडचिरोली जिल्हा विविध जातीच्या वनांनी नटलेला आहे. जिल्ह्यात बहुमोल वनस्पतींची भरमार आहे. भामरागड, चपराळा असे दोन अभयारण्य आहेत.

आष्टी : गडचिरोली जिल्हा विविध जातीच्या वनांनी नटलेला आहे. जिल्ह्यात बहुमोल वनस्पतींची भरमार आहे. भामरागड, चपराळा असे दोन अभयारण्य आहेत. परंतु या दोन्ही अभयारण्याचा कार्यभार एकाच वनपरिक्षेत्राधिकाऱ्याच्या भरवशावर असून दोन्ही अभयारण्यातील वनसंपत्ती व प्राण्यांच्या जीविताला धोका होण्याची शक्यता वाढली आहे. चौडमपल्ली वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या चपराळा अभयारण्याचे वनपरिक्षेत्राधिकारी क्रिष्णा पाटील यांची घोट येथे बदली झाल्याने सध्या भामरागडचे वनपरिक्षेत्राधिकारी बडोदे मागील दोन महिन्यांपासून चपराळा अभयारण्याचा कार्यभार सांभाळत आहेत. त्यामुळे त्यांना काम करतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. चौडमपल्ली वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर अंतर्गत चपराळा अभयारण्य २५ फेब्रुवारी १९८६ ला घोषित करण्यात आले. या चपराळा वन्यजीव अभयारण्याचे नाव चपराळा गावावरून पडले आहे. या अभयारण्याचे क्षेत्र मुलचेरा व चामोर्शी या दोन तालुक्यात पसरले आहे. अभयारण्यात रानमांजर, रानटी कुत्रा, चितळ, नीलगाय, तडस, हनुमान लंगुर, शेकरू, कोल्हा, रानडुकर आदींसह अनेक वन्यप्राण्यांची वास्तव्य आहे. मध्यंतरी या अभयारण्यात तीन वाघांनी प्रवेश केला होता. मात्र त्यांना राहण्यासाठी सुरक्षित क्षेत्र नसल्याची जाणीव होताच ते निघून गेले. याबरोबरच या अभयारण्यात सरपटणारे प्राणी व अनेक प्रजातींचे १९२ पेक्षा अधिक जीव वास्तव्यास आहेत. चपराळा अभयारण्याच्या हद्दीत एकूण सहा गावांचा समावेश आहे. यात चपराळा, चौडमपल्ली यासह अन्य चार गावांचा समावेश आहे. या अभयारण्याचे क्षेत्रफळ १३४ चौ. किमी आहे. परंतु एवढ्या मोठ्या क्षेत्राचा कार्यभार केवळ एका वनपरिक्षेत्राधिकाऱ्याकडे असल्याने वन्यप्राण्यांना धोका होऊ शकतो.