शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा लाख विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचा लाभ

By admin | Updated: March 24, 2017 01:03 IST

२०१७-१८ च्या शैक्षणिक वर्षात पूर्वी प्रमाणेच १ ते ८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाणार आहे.

शिक्षण विभागाची तयारी : सर्व शिक्षा अभियानचा उपक्रमगडचिरोली : २०१७-१८ च्या शैक्षणिक वर्षात पूर्वी प्रमाणेच १ ते ८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. जिल्हाभरात दोन हजार शाळा आहेत. या शाळेतील १ लाख २० हजार ४२४ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक योजनेचा लाभ दिला जाणार आहे. सर्व शिक्षा अभियान अंतर्गत १ ते ८ पर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. एक महिन्यापूर्वी पाठ्यपुस्तकांचे वितरण न करता पाठ्यपुस्तकांची रक्कम संबंधित विद्यार्थ्याच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे बँक खाते काढण्याचे निर्देश शिक्षकांना देण्यात आले होते. मात्र दोन महिन्याच्या कालावधीत सर्वच विद्यार्थ्यांचे बँक खाते काढणे शक्य होणार नाही. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी थेट लाभ योजनेतून पाठ्यपुस्तक योजनेला वगळले व पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्याचा निर्णय १५ दिवसांपूर्वी घेतला. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध व्हावेत, यासाठी शिक्षण विभागाच्या मार्फतीने नियोजन केले जात आहे. पाठ्यपुस्तक हे वितरण संबंधिच्या सर्व स्पष्ट सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मुख्याध्यापकांकडून लाभार्थी विद्यार्थ्यांची यादी मागविण्यात आली असून ती यादी शासनाकडे सादर करण्यात आली आहे. त्यानुसार २०१६-१७ या वर्षात मराठी माध्यमाच्या १ लाख १४ हजार ११५ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. इंग्रजी माध्यमांच्या गडचिरोली जिल्ह्यात एकूण १२ आश्रमशाळा आहेत. यामध्ये एकूण ४५६ विद्यार्थी आहेत. हिंदी माध्यमांच्या १४ शाळा आहेत. या शाळांमध्ये एकूण २ हजार ६५८ विद्यार्थी आहेत. उर्दू माध्यमाच्या पाच शाळा आहेत. यामध्ये एकूण २५६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानच्या माध्यमातून पाठ्यपुस्तके उपलब्ध होणार आहेत. पुढील वर्षीपासून खात्यात जमा होईल रक्कमथेट लाभ योजनेंतर्गत पाठ्यपुस्तकांचे वितरण न करता तेवढी रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. मात्र याला शिक्षण विभागातूनच प्रचंड विरोध होऊ लागला. विद्यार्थ्यांचे बँक खाते निघाले नाही तर तो विद्यार्थी लाभापासून वंचित राहिल. त्यामुळे विद्यार्थ्याला पुस्तकांविनाच शाळेमध्ये यावे लागेल. त्याचबरोबर एखाद्या पालकाने पाठ्यपुस्तकांचे पैसे बँकेतून काढून इतर कामांवर खर्च केल्यास पैसे मिळूनही विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित राहण्याचा धोका होता. मे महिन्यापर्यंत सर्वच विद्यार्थ्यांचे बँक खाते काढणे व त्याची माहिती शिक्षण विभागाला देणे अशक्य असल्यानेही थेट लाभ योजनेतून पाठ्यपुस्तके वगळण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.