शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

बेजूर गावात तलाव खोदकामाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2017 01:50 IST

सिंचनाच्या सुविधेपासून कायम वंचित असलेल्या भामरागड तालुक्यातील गावांमध्ये शेतकऱ्यांसाठी सिंचन सुविधा निर्माण व्हावी,

लोकबिरादरी प्रकल्पाची मदत : सिंचन सुविधा उपलब्ध होणार रमेश मारगोनवार भामरागड सिंचनाच्या सुविधेपासून कायम वंचित असलेल्या भामरागड तालुक्यातील गावांमध्ये शेतकऱ्यांसाठी सिंचन सुविधा निर्माण व्हावी, या हेतूने शेतकऱ्यांच्या सहभागातून लोकबिरादरी प्रकल्पाच्या मदतीने काही गावांमध्ये तलाव खोदकाम हाती घेण्यात आले आहे. गेल्यावर्षी जिंजगाव येथे तलाव खोदकाम केल्यानंतर यंदा बेजूर गावात तलाव खोदकामाला सुरुवात करण्यात आली आहे. भामरागड तालुका हा राज्यपालांनी दत्तक घेतलेला तालुका आहे. मात्र या तालुक्यात विविध समस्या आवासून उभ्या आहेत. नद्या असून त्या नद्यांच्या पाण्यावर प्रकल्प नसल्याने सिंचनाची सुविधा नाही. केवळ पावसाच्या भरवशावर या भागातील शेतकरी अवलंबून राहून शेती करीत आहे. या शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने लोकबिरादरी प्रकल्पाने डॉ. प्रकाश, डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या मार्गदर्शनात अनिकेत आमटे यांच्या पुढाकारातून तलाव खोदण्याचे काम सुरू केले आहे. गेल्यावर्षी जिंजगाव येथे तलावाचे खोदकाम करण्यात आले होते. यावर्षी जानेवारी महिन्यातच बेजूर गावात लोकबिरादरी प्रकल्पाच्या मदतीने मोठ्या तलावाचे खोदकाम करण्यास सुरुवात झाली आहे. पाण्याशिवाय विकास अशक्य असल्याने तलाव खोदकाम हाती घेण्यात आले असल्याचे लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे यांनी म्हटले आहे. तलाव निर्माण झाल्यावर परिसरातील शेतकऱ्यांना दोन पीक तलावाच्या पाण्यामुळे घेणे सोयीचे होईल. तसेच येथे मासेमारीही करता येईल. जमिनीतील पाण्याचा साठा वाढेल व परिसरातील जलस्त्रोतांना पाणी उपलब्ध होईल. सदर तलावाचे काम हे लोकसहभागातून केले जाणार आहे, असेही अनिकेत आमटे यांनी सांगितले.