कुरखेडा ठाणेदारांचे आवाहन : रमजान ईदनिमित्त पोलीस स्टेशनमध्ये इफ्तार पार्टीलोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांनी धार्मिक शिक्षणाबरोबरच शालेय शिक्षणाकडेसुद्धा लक्ष द्यावे, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी खडतर आर्थिक परिस्थितीवर मात करून उच्च शिक्षण अर्जीत केले व देशाच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले. त्यांचा आदर्श मुस्लिम विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन कुरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश घारे यांनी केले.कुरखेडा पोलीस स्टेशनच्या वतीने शनिवारी सायंकाळी ७ वाजता शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना ठाणेदार घारे बोलत होते. कार्यक्रमाला नगरसेवक बबलू हुसैनी, जामा मस्जिदचे इमाम, अयुब खान, विलास घिसाडी, सुधीर कटारे, आसिफ शेख, मजहर शेख, शाहरूख शेख, युसूफ खान, साजीद शेख, अशपाक खान, शमीम शेख आदी उपस्थित होते. संचालन सिराज पठाण तर आभार हवालदार नरेंद्र बांबोळे यांनी मानले. यावेळी पोलीस स्टेशनच्या वतीने अल्पोपहार व मिठाईचे वितरण करण्यात आले.
अब्दुल कलामांचा आदर्श बाळगा
By admin | Updated: June 28, 2017 02:28 IST