शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती निवारणासाठी दक्ष राहा

By admin | Updated: May 19, 2017 00:15 IST

आगामी पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज राहावे, या काळात सर्व यंत्रणांनी समन्वय राखून काम करावे,

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : व्यवस्थापन बैठकीत सर्व यंत्रणांच्या समन्वयावर भर लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : आगामी पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज राहावे, या काळात सर्व यंत्रणांनी समन्वय राखून काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी ए.एस. आर. नायक यांनी दिले. गडचिरोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झाली. त्यात जिल्ह्यात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन नियोजन तसेच आराखडा यांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. यावेळी अधिकाऱ्यांना त्यांनी अनेक सूचना केल्या. बैठकीला जि.प. अध्यक्ष योगिता भांडेकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनु गोयल, सहायक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जवळेकर, अधीक्षक अभियंता प्रदीप खवले, पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर आदींसह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाबाबत कृष्णा रेड्डी यांनी सादरीकरण केले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व तहसील कार्यालये, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, दुरसंचार विभाग तसेच नगरपालिका आदींनी १ जूनपासून २४ तास कार्यरत राहतील असे नियंत्रण कक्ष स्थापन करावेत तसेच आरोग्य विभागाने ७ जूनपासून याच स्वरुपाचे कक्ष कार्यान्वित करण्याचे निर्देश नायक यांनी यावेळी दिले. यावेळी अनेक शक्यतांवर चर्चा करण्यात आली. तीन वर्षात वीज कोसळून २८ जणांचा मृत्यू सन २०१३ ते २०१६ या तीन वर्षांच्या कालावधीत गडचिरोली ज्ल्ह्यिात वादळी पावसासोबत वीज कोसळण्याचे प्रकार होतात. अशा घटनांमध्ये २८ जणांचा मृत्यू झाला. अशा मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी ज्या ठिकाणी वीज पडण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणांवर वीज अटकाव यंत्रणा (लायटनिंग अरेस्टर) लावण्यासंदर्भात काम सुरु आहे. यावर्षी बीएसएनएलच्या टॉवरची संख्या वाढली आहे. वीज कोसळण्याची अधिक तिव्रता असणाऱ्या भागातील ४८ टॉवरवर लायटनिंग अरेस्टर बसविण्यात येणार आहे, असे उपमहाव्यवस्थापक सय्यद यांनी सांगितले. पूरपरिस्थितीने २४६ गावांचा तुटतो संपर्क जिल्ह्यात पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या एकूण गावांची संख्या २४६ इतकी आहे. त्यापैकी १११ गावांचा संपर्क तीन महिन्यांहून अधिक काळ राहत नाही. नद्यांना पूर आल्याने या गावांचा संपर्क तुटत असल्यामुळे या गावांमध्ये धान्य तसेच औषध साठा करुन ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.