शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

विविध उपक्रमांच्या माध्यमातून क्षयराेगाबाबत जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:37 IST

जिल्हा कुष्ठरोग कार्यालयामध्ये जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे यांच्या ...

जिल्हा कुष्ठरोग कार्यालयामध्ये जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. साळुंखे, प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील मडावी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सचिन हेमके, वैद्यकीय अधिकारी डॉ.रुपेश पेंदाम उपस्थित होते.

जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून १३ क्षयरोग पथका अंतर्गत विविध क्षयरोग जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शालेय विद्यार्थ्यांमध्ये क्षयरोगाबाबत जनजागृती घडवून आणण्यासाठी विविध शाळांमध्ये चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा स्तरावर त्यांचे परीक्षण करण्यात आले. जागतिक क्षयरोग दिनाच्या दिवशी निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

जागतिक क्षयरोग दिनाच्या कार्यक्रमामध्ये डॉ. अनिल रुडे, डॉ.सुनील मडावी, व डॉ. सचिन हेमके यांनी क्षयरोगाविषयी उपस्थित क्षयरुग्ण, आशा कार्यकर्त्या, शालेय विद्यार्थी व आरोग्य कर्मचारी व नागरिकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सचिन हेमके यांनी जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या ‘वेळ निघून जात आहे क्षयरोग उच्चाटन उद्दिष्ट गाठण्याची’ या घोषवाक्याच्या आधारे व्यापक जनजागृती करण्याचे आवाहन केले. जिल्ह्यातील इतरही आरोग्य संस्थांमध्ये विविध कार्यक्रम घेऊन जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला. संचालन गणेश खडसे व आभार प्रदर्शन यु. वाय. डाबरे यांनी केले. कार्यक्रमासाठी जिल्हा क्षयरोग कार्यालयातील डॉ. रुपेश पेंदाम , अनिल चव्हाण, नंदकिशोर आखाडे, राहुल रायपुरे, मनिष बोदेले, ज्ञानदीप गलबले, प्रमोद काळबांधे, लता येवले, वंदना राऊत, नजमा बेग आदी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.