शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

लेखापरीक्षण रखडले

By admin | Updated: January 1, 2015 23:00 IST

जिल्ह्यातील ८० ग्रामपंचायतींचे लेखापरिक्षण मागील दोन वर्षांपासून रखडले असून मागील वर्षाच्या लेखापरिक्षणाला सुरूवातही झाली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये सुरू असलेला

ग्रामपंचायत : गैरव्यवहार गुलदस्त्यातगडचिरोली : जिल्ह्यातील ८० ग्रामपंचायतींचे लेखापरिक्षण मागील दोन वर्षांपासून रखडले असून मागील वर्षाच्या लेखापरिक्षणाला सुरूवातही झाली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये सुरू असलेला सावळागोंधळ अजूनही चव्हाट्यावर गुलदस्त्यातच आहे. ग्रामपंचायतीचे सशक्तीकरण करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने सरळ ग्रामपंचायतीला निधी उपलब्ध करून देण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे शासनाकडून दरवर्षी लाखो रूपयांचा निधी ग्रामपंचायतीला प्राप्त होतो. त्याचबरोबर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातूनही काही योजना राबविल्या जातात व त्यासाठी सुद्धा निधी उपलब्ध करून दिल्या जातो. गावातील नागरिकही कराच्या माध्यमातून ग्रामपंचायतीकडे पैसे जमा करतात. या सर्व निधीचा विनियोग ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक करतात. त्यावर नियंत्रण ठेवण्याची महत्वाची जबाबदारी ग्रामसभा व इतर ग्रामपंचायत सदस्य पार पाडतात. शासनाकडून व जनतेकडून प्राप्त झालेल्या निधीचा योग्य कामासाठी उपयोग होत आहे किंवा नाही, याची शहनिशा करण्याचे काम लेखापरिक्षणाच्या माध्यमातून पूर्ण केले जाते. यासाठी जिल्हास्थळावर स्वतंत्र लेखापरिक्षण कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद व ग्रामपंचायतींचे लेखापरिक्षण केले जाते. जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदांची संख्या तुलनेने कमी असल्याने त्यांचे लेखापरिक्षण तत्काळ होते. मात्र ग्रामपंचायतींची संख्या प्रत्येक जिल्ह्यातच जास्त राहत असल्याने ग्रामपंचायतींचे लेखापरिक्षण करताना अडचणी येतात. गडचिरोली जिल्ह्यात एकूण ४६७ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींपैकी ८० ग्रामपंचायतींचे २०१२-१३ या आर्थिक वर्षाचे लेखापरिक्षण झाले नाही.२०१३-१४ या वर्षाचे लेखापरिक्षण करण्याची मंजुरी राज्यशासनाने अजूनपर्यंत दिली नाही. त्यामुळे या वर्षातील एकाही ग्रामपंचायतीचे लेखापरिक्षण झाले नाही. ग्रामपंचायतींच्या आर्थिक तसेच इतर व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याची महत्वाची जबाबदारी ग्रामसभा व इतर सदस्य निभावित असले तरी प्रत्येक वेळेसच त्यांचे नियंत्रण राहीलच याची खात्री देता येत नाही. ग्रामपंचायतीला सरळ निधी उपलब्ध करून देण्याचे धोरण शासनाने अवलंबिल्यापासून सरपंच तसेच ग्रामसेवकांनी निधीचा अपहार केल्याच्या अनेक घटना राज्यात व जिल्ह्यात घडल्या आहेत. हा सावळागोंधळ व अपहार लेखापरिक्षणाच्या माध्यमातून उजेडात येतो. मात्र अजूनपर्यंत ग्रामपंचायतीचे लेखापरिक्षणच झाले नसल्याने येथील गैरव्यवहार अजूनही चव्हाट्यावर आलेला नाही. राज्याच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्याची लेखापरिक्षणाची स्थिती चांगली असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. राज्यातील लेखापरिक्षणात समानता यावी, यासाठी २०१२-१३ चे संपूर्ण राज्यातील ग्रामपंचायतींचे लेखापरिक्षण पूर्ण झाल्याशिवाय इतर ग्रामपंचायतींचे लेखापरिक्षण करू नये, असे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे २०१३-१४ चे लेखापरिक्षण रखडले आहे.