शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
3
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
4
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
6
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
7
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
8
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
9
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
10
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
11
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
12
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
13
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
14
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
15
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
16
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
17
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
18
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
19
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
20
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांना हिवताप नियंत्रणाचे काम द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:35 IST

हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांना माहे जूनमध्ये हिवताप नियंत्रणासाठी कामाचे आदेश दिले जातात. परंतु मागील दोन-तीन वर्षांत काम मिळण्याचे प्रमाण कमी ...

हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांना माहे जूनमध्ये हिवताप नियंत्रणासाठी कामाचे आदेश दिले जातात. परंतु मागील दोन-तीन वर्षांत काम मिळण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. जिल्ह्यात एचए, एमपीडब्ल्यू, एएनएम आदी संवर्गाची पदे रिक्त आहेत. हिवताप नियंत्रणासाठी मनुष्यबळाची अधिक मागणी केल्यास हिवताप नियंत्रण चांगले होऊ शकते. सदर कर्मचारी आदेश मिळताच मुख्यालयाच्या ठिकाणी रुजू होतात तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र या ठिकाणी उपस्थित राहून चांगली सेवा देऊ शकतात. त्यासाठी कर्मचाऱ्यांना हिवताप नियंत्रण कामावर घ्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य हंगामी क्षेत्र कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गीतेश खेवले, सचिव घनश्याम भांडेकर, देवराव सातपुते यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

बाॅक्स

बेराेजगारांना मिळू शकताे राेजगार

जिल्ह्यातील हिवताप रोगाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन ती संख्या आटोक्यात आणण्यासाठी २०१६ मध्ये हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून संचालक हिवताप आरोग्य विभाग यांच्या आदेशानुसार भरती करण्यात आली. सदर कर्मचाऱ्यांवर राष्ट्रीय कीटकजन्य रोगनियंत्रण कार्यक्रमांतर्गत हिवताप व इतर कीटकजन्य आजार नियंत्रणात आणण्याचे काम सोपविले. हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांना गृहभेटी देणे, रक्त नमुने गोळा करणे, गप्पी मासे सोडणे, डबके व नाल्यातील पाणी वाहते करणे तसेच कीटक नियंत्रणासाठी फवारणी करणे, ही कामे करावी लागत हाेती. जिल्ह्यात हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांचा वापर हिवताप नियंत्रणासाठी करून घेतल्यास बेराेजगारांना रोजगार प्राप्त होऊ शकतो.