शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

कलावंतांचे अर्ज चार वर्षांपासून धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:36 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : कलेच्या माध्यमातून हजाराे नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणाऱ्या कलावंताला उतारवयात समाधानाचे जीवन जगता यावे, यासाठी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : कलेच्या माध्यमातून हजाराे नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणाऱ्या कलावंताला उतारवयात समाधानाचे जीवन जगता यावे, यासाठी राज्य शासनामार्फत साहित्य व कलावंतांना मानधन दिले जाते. या मानधनासाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे सुमारे २५० कलावंतांनी अर्ज केले आहेत. मात्र चार वर्षांपासून पालकमंत्र्यांनी निवड समितीचे गठण केले नाही. त्यामुळे हे संपूर्ण अर्ज चार वर्षांपासून समाज कल्याण विभागाकडे पडून आहेत. त्यामुळे कलावंतांना मानधनापासून वंचित राहावे लागते. वृद्ध साहित्यिक व कलाकारांना यापूर्वी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत मानधन दिले जात हाेते. आता हे मानधन संचालक कार्यालयामार्फत दिले जाते. कलावंतांना पूर्वीप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे अर्ज सादर करावे लागतात. अर्जांची निवड करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करावी लागते. ही समिती गठीत करण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना देण्यात आले आहेत. मात्र नवीन सरकारच्या कालावधीत समितीचे गठण झाले नाही. तसेच यापूर्वीच्या सरकारच्या कालावधीतही अर्जांवर विचार झाला नाही. त्यामुळे चार वर्षांपासून अर्ज समाज कल्याण विभागाकडे पडून आहेत. शेवटची निवड प्रक्रिया मार्च २०१७ मध्ये पार पडली.

बाॅक्स

कलावंत निवडीचे निकष

साहित्य व कला क्षेत्रात ज्यांनी माेलाची भर घातली आहे. किमान १५ ते २० वर्ष इतक्या कालावधीसाठी कामगिरी केली आहे. लाभार्थी कलाकार व साहित्यिकांचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त असावे. साहित्यिक व कलावंत यांच्या निधनानंतर विधवा पत्नी, विधूर पती यांना मानधन मिळेल. ४० टक्केपेक्षा जास्त अपंगत्व आल्याने ते स्वत:चा व्यवसाय करू शकत नाही. पुरूषांना वयाची अट शिथिल राहील. साहित्यिक व कलावंताचे सर्व मार्गांनी मिळून वार्षिक उत्पन्न ४८ हजारांपेक्षा जास्त असू नये.

मिळणारे मानधन

राष्ट्रीय पातळीवरील कलावंत ३१५०

राज्यस्तरावरील कलावंत २७००

जिल्हास्तरावरील कलावंत २२५०

अशी आहे निवड प्रक्रिया

पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेत या संबंधिच्या अर्जाचा नमुना उपलब्ध आहे. या नमुन्यावर वृद्ध साहित्यिकाचा पासपाेर्टच्या आकाराचा फाेटाे, त्याच्या कुटुंबाची माहिती. तहसीलदारांकडून उत्पन्नाचा दाखला, कलेचा प्रकार, किती वर्षांपासून कलेत कार्यरत आहे याची माहिती, कला क्षेत्राचे पुरावे म्हणून लेखनाची कात्रणे, कलावंतांच्या कार्यक्रमांची छायाचित्रे, वृत्तपत्रीय बातम्या, जाहिराती, आकाशवाणी अथवा दूरदर्शनवरील कार्यक्रमाचे पुरावे, निमंत्रणपत्रिका आदी पुरावे म्हणून जाेडता येतील.

काेट

विद्यमान पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे समिती गठीत करण्याबाबतचे पत्र दिले आहे. लवकरच समितीचे गठण हाेऊन अर्ज निकाली लागतील. प्रत्येक वर्षी ६० अर्ज निवडून त्यांना मानधन देता येते. मागील चार वर्षांमध्ये निवड झाली नसल्याने यावर्षांचा विचार करता २४० अर्ज मानधनासाठी पात्र ठरतील. वृद्ध कलावंतांनी अर्ज सादर करावेत.

- सुरेश पेंदाम, जिल्हा समाज कल्याण अधिकारी गडचिराेली